
आत्ताच्या काळात कवींनी शब्दांचा वापर अतिशय जबाबदारीने करणे गरजेचे आहे. कीर्ती जाधव यांच्या कविता आश्वासक आहेत, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
पुणे : आत्ताच्या काळात कवींनी शब्दांचा वापर अतिशय जबाबदारीने करणे गरजेचे आहे. कीर्ती जाधव यांच्या कविता आश्वासक आहेत, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
कवयित्री प्रा. कीर्ती जाधव यांच्या 'क्षण गुंफलेले' या कवितासंग्रहाचे आणि 'कोवळी उन्हे' या चारोळी संग्रहाचे प्रकाशन मोरे यांच्या हस्ते झाले. या वेळी ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी, डॉ. संगीता बर्वे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक निनाळे उपस्थित होते. काव्यसंग्रहाला प्रस्तावना डॉ. मोरे यांनी लिहिलेली आहे.
या प्रसंगी कुलकर्णी म्हणाल्या, ''कीर्ती जाधव या जीवनाबद्दल अतिशय सकारात्मक असलेल्या कवयित्री असून पुरुष भूमिकेत शिरून कविता करणे त्यांना लीलया जमलेले आहे. या कवयित्रीमध्ये निश्चितच वेगळेपण आहे.''
डॉ. बर्वे म्हणाल्या, ''या कवयित्रीचा माणुसकीवर प्रचंड विश्वास आहे. माणसाने माणसासाठी माणूस व्हावे अशा प्रकारच्या आश्वासक कविता या कवयित्रीच्या आहेत. जाधव यांनी आपल्या मनोगतात कवीचे व्यक्तिमत्त्व अंतर्मुख आणि बहिर्मुख अशा दोन्ही स्तरांवर लीलया वावरत असतं, असा उल्लेख केला.''
प्रास्ताविक उत्कर्ष प्रकाशन पुणेचे सु. वा. जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुजाता शेणई यांनी केले. आभार शशिकांत जाधव यांनी मानले.
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.
#SakalSamvad #WeCareForPune