पोहे, पोहा, अवलक्की...   

----------  - शिल्पा निंबाळकर, औंध  ---------------- 
Tuesday, 6 August 2019


गडबडीच्या वेळेला, कमी वेळेत, कमी श्रमात, चटकन तयार होणारा, पोटभरीचा पदार्थ म्हणजे पोहे. मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात तर पोहे हे ठरलेलेच. 

गडबडीच्या वेळेला, कमी वेळेत, कमी श्रमात, चटकन तयार होणारा, पोटभरीचा पदार्थ म्हणजे पोहे. मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात तर पोहे हे ठरलेलेच. 

महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक लोकप्रिय असा न्याहारीचा पदार्थ म्हणजे पोहे. कर्नाटकात त्याला अवलक्की म्हणतात. पोहे स्वच्छ करून, भिजत ठेवून, मग फोडणीची तयारी करायची, फोडणीत जिरे, मोहरी तडतडली की कढीपत्ता, शेंगदाणे, कच्चा अथवा उकडलेला बटाटा, सर्व छान परतून झाल्यावर कांदा, हळद, हिरवी मिरची, छान परतल्यानंतर मीठ घालून मस्तपैकी मिसळून घ्यायचे अन्‌ वरून लिंबू पिळून, हिरवी अशी ताजी कोथिंबीर, पांढराशुभ्र असा ओल्या नारळाचा किंवा सुक्‍या खोबऱ्याचा किस, बारीक वा जाड शेव किंवा फरसाण घालून डिशमध्ये पोहे खाण्यास तयार. मस्त घमघमाट आला की खाण्याची इच्छा प्रदीप्त होतेच. 

पोहे बऱ्याच जणांना आवडतात तर काहींना अजिबातच नाही. तसेच मुलांचेही. काहींना आवडतील तर काहींना अजिबातच आवडत नाहीत, नुसते नाव काढले तरी तोंडे वाकडी होतात. तर काहींना पोहे खाऊन पित्ताचा त्रास होतो म्हणून खाणे टाळले जाते. 
महाराष्ट्रात तर मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात शिरा, पोहे आणि चहा हे म्हणजे ठरलेलेच समीकरण. नटूनथटून, लाजत-लाजत मुलगी बिचारी सर्व पाहुणे मंडळींना पोहे आणून देते, कांदापोहे खाल्ले तरी प्रत्येक पाहण्याचा कार्यक्रम यशस्वी होतोच असे नाही. काही लग्ने जुळतात तर काही नाही, हा भाग वेगळा. 
काही वर्षांपूर्वी तर "कांदेपोहे" नावाचा एक चित्रपटही आला होता, ज्यातले एक गाणे "आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे' (गीतकार ठाऊक नाही) जे सुनिधी चौहानने अप्रतिम गायले होते. 

घरात एखादी दुःखद घटना घडली असेल, तेव्हा शेजारी किंवा आप्तेष्टांकडून जे डबाभरून पोहे येतात ना ते कितीही चवदार बनवलेले असले, तरी एक चमचासुद्धा घशाखाली जात नाही हो. 
पोहे करताना सहज डोक्‍यात "पोहे' या विषयाचा किडा डोक्‍यात वळवळत होता, म्हणून हा पत्रप्रपंच. काय तर मग सर्वांना कसे वाटले पोहे? 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pohe, poha, aavlakki