पोतराज प्रथा बंद करुन रोजगार द्या

अनिल अगावणे
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : अंगावर चाबकाचे फटके मारून, पायातील चाळ वाजवुन, नागरिकांकडून पैसे मागणे अशा प्रथा या विज्ञानयुगात बंद झाल्या पाहिजेत. कारण रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांकडून किंवा वाहनचालकांकडून पैसे मागणे हे आता नित्याचे झाले आहे.

गर्दीच्या ठिकाणी हि पोतराज मंडळी पैसे मागताना नेहमी दिसतात. त्यामुळे वाहन चालकांना किंवा नागरिकांना चाबकाच्या फटक्यातून वाचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. अशा प्रकारे पैसे मागणाऱ्यांना बंदी घालण्यात आली पाहिजे. स्मार्ट सिटीत कष्ट न करता पैसे मागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर प्रशासनाने वेळीच अंकुश ठेवला पाहीजे. तरी पोतराज सारखी प्रथा बंद करून त्यांना जगण्यासाठी रोजगार उपलब्ध करून दिले पाहीजे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The pothraj tradition should be stop