
तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या
पुणे : कामठे पाटील नगर येथील सोसायटीत महानगरपालिकेच्या ड्रेनेज लाइन नसल्यामुळे दररोज येथील सोसायटीतील मैलापाणी रस्त्यावर सोडले जाते. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी व रोगराई पसरत आहे. तसेच, येथील रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून त्यामुळे येथील नागरिकांना पायीं चालणे सुद्धा अवघड झाले आहे.
पिण्याच्या पाण्याच्या अपुरया पुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. छोटे रस्ते, पदपाथ नाही, जड़ वाहनाची वाहतूक यामुळे येथील नागरिकांना जीव मुठित धरून चालावे लागते. रात्रीच्या वेळी येथे लुटमारीचे प्रसंग घड़तात. पुणे महानगर पालिकेमध्ये समावेश होऊन देखील सुद्धा येवलेवाडीतील समस्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष का?