अतिक्रमणामुळे सार्वजनिक रस्ते बंद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून 

पुणे : अप्पर ओटा येथील असलेल्या चाळीतील रस्ते चाळीतील लोकांनी अतिक्रमण करून बंद केले आहेत. येथे असलेले सार्वजनिक मैदानाच्या बाजूचे रस्ते तेथील राहणाऱ्या लोकांनी जवळ जवळ बंद केले आहेत. पूर्वी कधी असे अतिक्रमण झाले की पुणे महानगरपालिकेची अतिक्रमण खात्याचे अधिकारी येऊन लगेच कारवाई करीत असे. पण, सध्या स्थानिक तथाकथित समाज सेवकांनी सगळे अतिक्रमण केले आहे. व्हिआयटी शाळेकडून जो मुख्य रस्ता सोडल्यास आतील रस्ते बंद झाल्या सारखे आहेत. तो रस्ता जर काही कारणास्तव कधी बंद झाला तर लोकांची खूप पंचायत होते. कधी जर चुकून आग वैगरे लागली तर साधा अग्निशम दलाची गाडी सुद्धा येऊ शकत नाही. तरी महानगरपालिकेने लक्ष घालून हे रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Public road closures due to encroachment