पुण्यातील बसचालकांना पुन्हा प्रशिक्षणाची गरज!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 September 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : पुण्यातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललीये. त्यामुळे वाहनांमध्ये ही वाढ होत आहे. अशातच सकाळच्या वेळी चाकरमान्यांची ऑफिसला जायची घाई असते. त्यात पिएमपी बस मधुन खुप लोक प्रवास करत असतात. पण सध्या असे चित्र असे आहे की, पिएमपी बसचालकांना पुन्हा एकदा वाहन चालवण्याचे प्रशिक्षण द्यायला हवे.

गर्दीच्या ठिकाणी काही बसचालक मुद्दाम बस रस्त्यावरून खाली घेतात. आणि निसरड्या अशा चिखलाच्या भागातून बस पुढे दामटतात. एवढी मोठी बस अशी चालवणे हे धोकादायक नाही का? की आता यांना प्रवाश्यांच्या जीवाची चिंताच उरलेली नाहीये? या अशा प्रकारामुळे अपघातांना आमंत्रण मिळते. पिएमपी विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. चालकांना याबाबत सुचना द्याव्यात अशी विनंती.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune bus drivers need re-training