बेशिस्त पार्किंगमुळे रस्ता बंद

- दिलीपकुमार सराफ
सोमवार, 30 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

फडके हौद : वज्रदेही शनी मंदिर ते लक्ष्मी रोडवरील हा रस्ता नेहमी स्कूटर आणि मोटार सायकल बेशिस्त पार्किंगमुळे बंद असतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हे वाहने पार्क केलेली असतात. त्यामुळे या रस्त्यावर जागा कमी झाल्यामुळे 4 चाकी वाहने किंवा 3 चाकी वाहनांना अडथळा निर्माण होतो. जर दोन्ही बाजुने चारचाकी वाहने आली तर रस्ता पुर्ण बंद होतो. चारचाकी रस्ता असूनही रस्त्यावर अडथळा होतो. नो पार्किंगचा फलकासमोरच वाहने दुचाकी लावली जातात. यावर वाहतूक पोलिसांनी कोणतीही कारवाई करत नाही. तरी महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. बेशिस्त दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई करावी.  
 

Web Title: road block due to unskilled parking