कोंढरेनगर येथील रस्त्याची दुरवस्था 

प्रशांत सानप 
Friday, 10 January 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

 पुणे : आंबेगाव, बाळासाहेब कोंढरेनगर येथे गणेश ग्रेसलॅंड ते कुल होम्स पंचामृत सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता (अंदाजे लांबी 150 मीटर) महामार्ग व वडगाव बुद्रुक(धबाडी)ला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ जास्त असते. तसेच नुकत्याच सुरू झालेल्या ऑर्किड शाळेमुळे गर्दीत भर पडली आहे. यावर्षी झालेला अति पाऊस आणि नेहमी साचणारे पाणी यामुळे मुरमाची भर टाकून बनवलेला तात्पुरता रस्ता पूर्णपणे खचून गेला आहे. येथून गाडी चालवताना कसरत करावी लागत आहे. महामार्ग ते गणेश ग्रेसलॅंडपर्यंत सिमेंटचा रस्ता अस्तित्वात आहे. उरलेला कच्चा रस्ता हासुद्धा सिमेंटचा व्हावा यासाठी गेले अनेक दिवस रहिवासी लोकप्रतिनिधींशी पाठपुरावा करत आहेत. तसेच पंचामृत सोसायटीजवळील रस्ता हा मूळ रस्त्यापेक्षा अरुंद व धोकादायक वळणाचा आहे. यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. एकीकडे सहापदरी कात्रज बायपास महामार्गाच्या गोष्टी होत असताना, मूलभूत सोयींसाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. लवकर चांगल्या दर्जाचा व रुंद रस्ता तयार करून रहिवाशांचा त्रास कमी करावा. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road Condition