पुणे : नाना पेठ येथील राजेवाडीतील स्वच्छतागृह अस्वच्छ आहे. राजेवाडी परिसरातील अनेकांच्या घरात शौचालयाची सुविधा नसल्याने अनेक नागरिक या सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करतात. मात्र, नियमित स्वच्छतेअभावी स्वच्छतागृह अस्वच्छ आहे. त्यामुळे नागरिकांची कुचंबणा होत आहे.

या स्वच्छतागृहाच्या बाहेरील भिंती स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावाने रंगविण्यात आल्या आहे. मात्र आतील परिस्थिती पाहता स्वच्छतेचा मागमूस दिसत नाही. हे स्वच्छतागृह रस्त्याच्या कडेला असल्याने रस्त्यावरून जाताना पादचारी व वाहनचालकांनासुद्धा नाकाला रुमाल बांधूनच जावे लागते.
येथील नळ, भांडी तुटलेली आहेत आणि फरश्या उखडलेल्या आहेत. भिंती गुटखा व मिसरीने रंगविण्यात आल्या आहेत. स्वच्छतागृहात व बाहेर इतरत्र कचरा पडलेला आहे.
दरवाजे कुजलेले व मोडक्या अवस्थेत आहेत. राजेवाडी या परिसरात बहुसंख्येने लोक राहतात. अनेकांच्या घरात शौचालयाची सुविधा नसल्याने अनेक नागरिक या स्वच्छतागृहाचा वापर करतात. याची नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांची कुचंबणा होत आहे.
'' आमचे कर्मचारी या ठिकाणी नियमित स्वच्छता करत असतात. लोकांमध्ये ही जनजागृती होणे अपेक्षित आहे. अनेकदा बसविण्यात आलेले नळ चोरीस जातात. एका संस्थेमार्फत त्या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी सर्व साहित्य मोफत पुरविले जाते. अधिक माहिती घेऊन स्वच्छतागृहात नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.''
- दयानंद सोनकांबळे, सहायक आयुक्त, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय