जंगली महाराज रस्त्यावर स्कुल बसमुळे अडथळा

- रावी
सोमवार, 30 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

जंगली महाराज रस्ता : येथे मार्डन हायस्कुल जवळ दररोज स्कुलबस दुपारी पार्क केलेल्या असतात. रहदारीच्या वेळी या रस्त्यावर स्कुलबसमुळे अडथळा निर्माण होतो. संध्याकाळी रहदारी खुर जास्त असते. अशावेळी शाळकरी मुले-मुली स्कुलबसमध्ये चढतात. हा प्रकार पा़हुन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी वाटते. स्कुल कॅम्पसमध्ये भरपूर जागा आहे जिथे या बसेस भरल्या पाहिजेत. कोणताही अनुचित प्रकार होण्यापुर्वी शालेय प्रशासन आणि महापालिकेने याकडे लक्ष द्यावे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schoolbus Barrier on jm road