सिग्नल आणि विजेच्या खांबावर सुध्दा बॅनर

शिवाज पठारे 
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर वनाज कंपनी चौकात सिग्नल व विजेच्या खांबाचा आधार घेऊन बॅनर लावले आहेत. सध्या शहरात जिथे जागा मिळेल तेथे फलक लावून शहर विद्रुप केले जात आहे. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. शहरात प्रशासन काम करते आहे की, नाही असा प्रश्न पडतो. पूर्वीच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून मतदारांनी नवीन कारभाऱ्यांच्या पदरात भरगोस दान टाकले. परंतू कारभार सुधारण्याऐवजी परिस्थिती अजूनच बिकट झाली आहे. मतदारांचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. हाच मतदार राजा सत्ता देतो तशी काढूनही घेतो हे लक्षात घेऊन वेळीच हे प्रकार थांबवावेत. सर्व शहरात फ्लेक्स बंदी करावी.

 

Web Title: Shivaji Pathare Write about Banners are placed on signal and electric pole