शिवसृष्टीसाठी पुण्यात फक्त सिंहगड किल्लाच योग्य

बाबासाहेब चव्हाण
सोमवार, 25 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : 'पुण्यात शिवसृष्टी उभारण्यासाठी, बी.डी.पी.च्या जमीन अधिग्रहणासाठी 400 कोटींची गरज', 'आंबेगाव येथील खासगी शिवसृष्टीसाठी सरकारकडून 300 कोटींची मदत', 'सिंहगड घाटात दरडी कोसळल्याने आणि बेशिस्त वाहतूकीने कोंडी', 'खडकवासला धरण परिसरात वाहतूककोंडी, स्थानिक नागरिकांचा अत्यावश्यक सेवा', 'उपचारासाठी तासंतास रस्त्यातच खोळंबा' , या आणि अशा कैक बातम्या वर्तमानपत्रात येत आहेत. या बातम्यांचा विचार केला तर असे लक्षात येईल की काही गोष्टींसाठी पुण्यात कोटींच्या कोटी उड्डाणे घेतली जातात. प्रसंगी काही नियम ही बदलले जातात.

खरंतर शिवसृष्टीसाठी पुण्यात फक्त सिंहगड किल्लाच योग्य असताना ओढून ताणून वेगवेगळ्या ठिकाणांचा घाट घातला जातो आहे. शिवसुष्टी सारखा एकमेव प्रकल्प संपूर्ण सिंहगड, खडकवासला भागातील सर्व समस्यांचे निराकरण करु शकतो. ही कोटींची उड्डाणे सिंहगडाच्या दिशेने उडाली तर छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्र सरकार व पुणे मनपाला धन्यवाद देतील. पण महाराजांच्या नावाने फक्त राजकारण करणारे इकडे लक्ष देतील तर शपथ!

Web Title: for shivsrushti only the sinhagad fort is sutaible