अशी असते का स्मार्ट सिटी? 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : औंधमधील आयटीआय रस्त्यावर दोन आठवड्यांपूर्वी स्मार्ट सिटी प्रोग्राम अंतर्गत काम सुरू केले आहे. एका बाजूला पादचारी मार्गासाठी रस्ता खोदला आहे. हे काम प्रगतिपथावर असताना पालिकेने दुसऱ्या बाजूला फटाक्‍यांचे स्टॉल्स लावण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी या रस्त्यावर असे प्रकार होत नव्हते. त्यामुळे स्थानिक रहिवाशांसाठी हे धक्‍कादायक आहे. त्यात स्थानिक नगरसेवकांनी 4 नोव्हेंबरपासून आयटीआय रस्त्यावर शेतकऱ्यांचा आठवडे बाजार चालू केला आहे.

या क्षेत्रातील स्थानिक नागरिकांना आणखी एक अनपेक्षित गोष्टीला समारे जावे लागत आहे. या रस्त्यावर काम चालू असताना फटाका स्टॉल आणि आठवडे बाजारसाठी ही जागा कशी काय दिली? या प्रकारामुळे स्थानिक नागरिक चिंतेत असून, महापालिकेने याकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Is that a smart city?