बीएसएनएलचे बंद टॉवर सुरू करा 

पंजाबराव देशमुख 
Thursday, 7 November 2019

पुणे : भारत संचार निगम (बीएसएनएल) ही केंद्र शासनाची कंपनी असून, केवळ निधीअभावी विद्युत बिले न भरल्याने बरेच ट्रान्समिशन टॉवर बंद आहेत. त्यामुळे कॉल न लागणे, अचानक कट होणे, रेंज न मिळणे या बाबींमुळे ग्राहक वैतागले आहेत; पण नुकतीच बीएसएनएलला 70 हजार कोटी रक्कम दिल्याचे वाचले व थोडा दिलासा मिळाला. बीएसएनएलवर कॉल लागतात; पण इंटरनेटची रेंज मिळत नाही म्हणून जिओ सिम घेतले, तर त्यावरून इंटरनेट मिळते; पण कॉल लागत नाहीत, असा अनुभव घेत आहे.

पुणे : भारत संचार निगम (बीएसएनएल) ही केंद्र शासनाची कंपनी असून, केवळ निधीअभावी विद्युत बिले न भरल्याने बरेच ट्रान्समिशन टॉवर बंद आहेत. त्यामुळे कॉल न लागणे, अचानक कट होणे, रेंज न मिळणे या बाबींमुळे ग्राहक वैतागले आहेत; पण नुकतीच बीएसएनएलला 70 हजार कोटी रक्कम दिल्याचे वाचले व थोडा दिलासा मिळाला. बीएसएनएलवर कॉल लागतात; पण इंटरनेटची रेंज मिळत नाही म्हणून जिओ सिम घेतले, तर त्यावरून इंटरनेट मिळते; पण कॉल लागत नाहीत, असा अनुभव घेत आहे. बीएसएनएलच्या स्थानिक कार्यालयात चौकशी केली असता आता वीज बिल भरण्यासाठी पैसे आहेत; पण आनंद पार्क येथील टॉवर असलेल्या इमारतमालकाने 17 वर्षांपासून महापालिकेचा कर भरला नसल्याने टॉवर सुरू होऊ शकत नसल्याने गणेशनगर, सोमनाथनगर, वडगाव शेरी भागात इंटरनेटची रेंज मिळत नाही, असे सांगितले. यातून मार्ग काढण्यासाठी मालकाने मालमत्ता थकीत कर त्वरित भरावा किंवा महापालिकेने सील काढून वीजपुरवठा सुरू करून द्यावा. बीएसएनएल मालकास दरमहा टॉवरचे भाडे देते. हे त्वरित होणे गरजेचे आहे, कारण बीएसएनएल कंपनी बंद होणार, असा इतर कंपन्या अप्रचार करत आहेत. ग्राहकही खरेखोटेपणाची शहानिशा न करता सिम बंद करतील. त्यामुळे बंद पडलेले टॉवर तत्काळ सुरू होणे आवश्‍यक आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Start the closed tower of BSNL