#WeCareForPune मी गोरख चिंच

विनायक बोरकर 
Thursday, 7 March 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

सा.न .वि. वि. 

मी गोरख चिंच, पत्र लिहीण्यास कारण की, गेली काही वर्षे नक्की सांगता येणार नाही परंतू, शतकाहून अधिक काळ मी चित्रकलाचार्य नारायणराव ई पूरम (अभिनव कला महाविद्यालय) चौकात, बाजीराव रोडच्या मेंहदळे हाऊसच्या सांगितिक संगतीत, अत्रे सभाग्रहाच्या साहित्यिक सहवासात, अभिनव कलाच्या रंगी बेरंगी वातावरणात, व कात्रजहून शनिवार वाड्याच्या दिशेने जाणाऱ्या पेशवे कालीन पाणी पुरवठ्याच्या पाझरावर माझे भरण-पोषण झाले आहे. पक्ष्यांच्या अनेक पिढ्यांचे संसार माझ्या अंगाखाद्यावर फुलले आहेत, कित्येक पांथस्थांनी माझ्या सावलीत विसावा घेतला असेल याची गणतीच नाही. परंतू आता हे नष्ट होत चाललंय की काय याची भिती वाटू लागली आहे. 

रस्त्यावरील डांबरांच्या थरांनी वपायवाटे साठी ठेवलेल्या फुटपाथवर सुद्धा सिंमेंट ब्लॉक नामक वस्तूने व ते बसवण्यासाठी वापरलेल्या सिमेंट काँक्रिटने माझ्या गळ्याभोवतीचा फास आवळला जात असून येथून पुढे माझ्यातील नैसर्गिक शक्ती जोपर्यत टिकेल तो पर्यतच मी तीथे उभा राहू शकेन असे वाटते.सबब माझ्या गळ्या भोवती जे सिमेंट चे फास आवळले जात आहेत ते काढता आले तर बघा, अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे.
कळावे 

गोरख चिंच

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: story of A tamarind tree