स्वरललकाराची पंचवीस वर्षे पूर्ण...

सुभाष इनामदार
Monday, 22 July 2019

आपल्या आई आणि वडिलांच्या स्मरणार्थ त्यांची स्मृती जपून त्यांना सांगेतीक स्वरसुमन गेली पंचवीस वर्ष अपर्ण करणाऱ्या आपटे परिवाराचे ब्रीद पुढे चालू ठेवण्याचा वसा रसिक आणि या परिवारात सामील झालेल्या लोकांनी घेतला..

पुणेः आपल्या आई आणि वडिलांच्या स्मरणार्थ त्यांची स्मृती जपून त्यांना सांगेतीक स्वरसुमन गेली पंचवीस वर्ष अपर्ण करणाऱ्या आपटे परिवाराचे ब्रीद पुढे चालू ठेवण्याचा वसा रसिक आणि या परिवारात सामील झालेल्या लोकांनी घेतला.. हीच परंपरेची पालखी आता पुढे जाणार आहे.

ललकारचे कै. नानासाहेब आपटे आणि कै. कमलाताई आपटे यांच्या स्मृतीदिनानिमित्त रविवारी (ता. 21) सकाळी भरत नाट्यमंदिरात राहुल देशपांडे यांनी राग बसंत मुखारी आपल्या तरल स्वरसजातून बहरात नेला आणि यंदाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या सत्राचा आरंभ केला. स्वरांची आवर्तने घेत अलबेला सजन आयो.. ही बंदिश राहुलने रंगविली.. आणि रसिक तृप्त झाला.. मग प्रियांका बर्वे कुलकर्णी हिने स्वरमंचाचा ताबा घेतला आणि माऊली टाकळकरांना (वय 92) टाळाच्या साथीला बोलावून बोलवा विठ्ठल.. हा अभंग सादर केला.

उत्तरोत्तर मैफल रंगत जाणार ह्याची जाणीव उपस्थित मान्यवरांना झाली. राहुल गोळे, निखिल फाटक, अनय गाडगीळ या साथीदारांनी मैफलीचे स्वर ताल पक्के केले आणि गाण्याचा मनमुराद आनंद रसिकांना भरभरून दिला. रवींद्र आपटे, आशा भामे आणि चंद्रशेखर आपटे या तीन कुटुंबीयांनी अशी मैफल दरवर्षी रंगवीत ठेवतात.. यंदाही आपल्या स्वबळावर ती आयोजित केली..

संकल्पना आणि सादरीकरण यात ते आता तयार झाले आहेत.. त्यांचा असा खास रसिक वर्गही आवर्जून येत असतो.. पण या ललकारच्या स्मृती पुढील पिढीपर्यंत नेण्यासाठी परिवाराने पुढे येण्याची कल्पना एका आपटे परिवाराच्या जवळच्या रसिकाने बोलून आपटे परिवाराला धन्यवादही जाहीर केले. राहुल देशपांडे यांनी कट्यार मधील घेई छंद रसिकांच्या आग्रहाखातर गायले. प्रियांका बर्वे यांनी नाही मी बोलत.. नाट्यपद ऐकवून आपल्या आजीची कुणीही पाय नका वाजवू आणि लपविलास तू हिरवा चाफा.. सादर केली.. राहुलने मग बगळ्यांची माळ फुले..चा टवटवीत आणि रसरशीत गजर केला.. आणि शेवटी कानडा राजा पंढरीचा.. अभंग रसिकांच्या ह्रदयात साठवून या मैफलीची सांगता एका टप्प्यावर केली..

रविवार सकाळच्या या ललकार प्रणीत स्वरलहरी आठवतच पुन्हा पुढच्या जुलै मध्ये पुन्हा नव्या गायकाला रंगमंचावर पहायचे ठरवून लोक पांगले..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swarlalkar Twenty five years completed