सांगरुण प्राथमिक केंद्रात रात्रीच्या वेळी कर्मचारीत नाही

विकी अशोक मानकर
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

पुणे : हवेली तालुक्यातील सांगरुण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असुविधा वाढल्या आहेत. रात्रीच्या वेळी एकही जबाबदार कर्मचारी हजर राहत नाहीत. रुग्णांवर वेळेवर उपचार होत नसल्याने हे केंद्रच आजारी असल्याची चर्चा आहे. शासनाने गोरगरिबांना मोफत आरोग्य तपासणी करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन सुसज्ज आरोग्य केंद्राची उभारणी केली. त्यासाठी इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे, परंतु या ठिकाणी वैद्यकीय अधिकारीच नसेल तर लाखो रुपये खर्चून काय फायदा आहे, असा प्रश्‍न ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.

पुणे : हवेली तालुक्यातील सांगरुण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असुविधा वाढल्या आहेत. रात्रीच्या वेळी एकही जबाबदार कर्मचारी हजर राहत नाहीत. रुग्णांवर वेळेवर उपचार होत नसल्याने हे केंद्रच आजारी असल्याची चर्चा आहे. शासनाने गोरगरिबांना मोफत आरोग्य तपासणी करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन सुसज्ज आरोग्य केंद्राची उभारणी केली. त्यासाठी इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे, परंतु या ठिकाणी वैद्यकीय अधिकारीच नसेल तर लाखो रुपये खर्चून काय फायदा आहे, असा प्रश्‍न ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. परंतु या ठिकाणी बोटावर मोजता येतील इतके कर्मचारी दवाखान्यात राहत असल्याने परिसरातील रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्राथमिक केंद्राच्या मुख्यालयात उपस्थित नसणाऱ्या कर्मचार्‍यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

तसेच या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचार्‍यांसाठी लाखो रुपये खर्च करून निवास बांधकाम करण्यात आले आहे. परंतुया ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी मुख्यालयाच्या निवासस्थानात न राहता दुसर्‍या ठिकाणावरून ये-जा करतात. रात्रीच्या वेळी येणार्‍या रुग्णांना उपचारासाठी पुणे येथे जावे लागत आहे. 
- विकी अशोक मानकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no employee at night at Sangrun Primary Center