रस्ता दुरुस्त होईपर्यंत  सातारा रस्त्यावर टोल बंद करा 

- अकाश गिरमे 
Wednesday, 6 November 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : गेल्या आठवड्यात साताऱ्याला जाणे झाले. तासात परत येणार असल्याने खेड-शिवापूर टोलनाक्‍यावर परतीचेदेखील टोल शुल्क भरले. परंतु येताना वाहतूक कोंडीमुळे टोलनाक्‍यावर पोचण्यास निर्धारित वेळेपेक्षा अर्धा तास जास्त लागला. 
वाहतूककोंडीची कल्पना देऊनही तसेच आदल्या दिवशी परतीचे टोलशुल्क भरलेले असताना देखील अरेरावी करून पुन्हा नव्याने टोल आकारण्यात आला. वाहतूक कोंडीमुळे उशीर होण्यास वाहनचालक एकटेच जबाबदार आहेत का ? वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी नाही का ? तसेच पुणे-सातारा महामार्गाची अवस्था पाहता, एक रुपया टोल आकारण्यास देखील तेथील स्थानिक प्रशासन पात्र नाही. कृपया रस्ते दुरुस्ती होईपर्यंत टोलशुल्काच्या नावाखाली वाहनचालकांची होणारी लूट थांबवावी, तसेच अरेरावी करणाऱ्या टोल कर्मचाऱ्यांना आवर घालावा. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Toll off Satara road until the road is repaired