esakal | 'पीएमपीएल' चा प्रवास त्रासदायक!
sakal

बोलून बातमी शोधा

rainbow pmpl

'पीएमपीएल' चा प्रवास त्रासदायक!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सिंहगड रस्त्यावरील अनेक रहिवाशी पीएमपीएल ने प्रवास करतात. पण या मार्गांवरील बस ह्या इंद्रधनुष(तेजस्विनी) याच बस असतात. या बसेस खूप लहान आहेत. गर्दीच्या वेळेस बसमध्ये ऊभं रहायला सुध्दा जागा नसते. आणि बस ही जिथून निघते तिथूनच भरूते. त्यामुळे पुढे याच बसचा मार्ग असण्ऱ्या नागरिकाना याचा त्रास होतो. जर प्रशासनाने इंद्रधनुष (तेजस्विनी)च्या ऐवजी बीआरटीच्या बस सोडल्या तर प्रवाशांचा नीट प्रवास होईल. मंडई-वडगाव किंवा धायरी या मार्गावर तसेच शनिवारवाडा-सिंहगड या बसची अवस्था खूपच दयनीय असते. प्रवाशी खुप दाटीमध्ये प्रवास करतात.

पीएमपीएलच्या ताब्यात नवीन बस येऊनही यातील एकही बस सिंहगड रोडवर येत नाही आणि यावर पीएमपीएलचे अधिकारी उत्तर देत नाहीत.
याकडे प्रशासन गांभीरयाने बघेल ही आशा.

loading image
go to top