रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे नागरिकांना त्रास

शिवाजी पठारे
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : कोथरूड परिसरातील मयूर कॉलनीतील डीपी रस्त्याची वर्क ऑर्डर जानेवारी २०१८ मध्ये दिलेली आहे. हे काम ९ महिण्यात पूर्ण करण्याची मुदत आहे. या कामाची मुदत या महिनाअखेर संपत असून अद्यापही काम अपूर्ण आहे. सर्वत्र राडारोडा पसरला आहे.

फूटपाथची कामेही अपूर्ण आहेत. त्यामुळे फूटपाथवरून चालताही येत नाही. याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. महानगरपालिकेने या बातमीची दखल घेऊन संबंधीत ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी .हे काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांचा त्रास थांबवावा.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trouble to citizen due to unfinished work on the road