बंद भुयारी मार्ग सुरु करा

शिवाजी पठारे 
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

कोथरूड : पौड रस्त्यावर वनाज चौकात नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी मोठा खर्च करून महापालिकेने भुयारी मार्ग बांधला आहे. परंतू हा भुयारी मार्ग कायम बंदच असतो. सध्या या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्ता अतिशय अरूंद झाला आहे. परंतू सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्याचा भुयारी मार्गच बंद असल्याने एवढा केलेला खर्चाचा उपयोग शून्य अशी परिस्थीती आहे. हा नागरिकांनी दिलेल्या कररूपी पैशांचा अपव्यय आहे. स्मार्ट सिटी करू पाहणाऱ्या कारभाऱ्यांनी व प्रशासनाने आधी या बाबींची दखल घ्यावी नंतरच स्मार्ट सिटीच्या वल्गना कराव्यात.
 

Web Title: turn on the subway