डेक्कन नदीपात्रात बेवारस वाहने 

अनिल  अगावणे
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : नदीपात्रातील बाबा भिडे रस्त्यावर पार्किंगमुळे पादचाऱ्यांना जाण्यायेण्यासाठी मार्गच नाही. दिवसेंदिवस पार्किंगची समस्या जटील झाल्यामुळे नदीपात्रात मोफत पार्किंगची संख्या वाढली आहे. त्यात भर बेवारस वाहनांची होत आहे. महापालिका प्रशासनाने पावसाळ्यात गाड्या नदीपात्रात लावू नये असे फलक लावले असताना सुद्धा, चारचाकी वाहने नदीपात्रात नदीची पातळी वाढल्या नंतर सुद्धा पडून असतात. त्यात बेवारस वाहनांवर जलपर्णी, कचरा, राडारोडा अडकल्यामुळे दुर्गंधी वाढून डासांचे प्रमाण सातत्याने वाढताना दिसत आहे. ही बेवारस वाहने या ठिकाणी पार्क करून गाडी मालक बेपत्ता झाले आहेत. याचा महापालिका व पोलिस प्रशासनाने गांभिर्याने विचार करून ही बेवारस वाहने ताबडतोब हलवून होणाऱ्या त्रासापासून मुक्तता द्यावी. नाहीतर या वाहन मालकांचा तपास करुन ती वाहने विल्हेवाटीसाठी त्यांच्या ताब्यात द्यावीत.
 

Web Title: unknown vehicles in the Deccan basin