दुधासाठी टेट्रापॅक कंटेनरचा वापर ठरेल पर्यावरणपुरक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 December 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : दुधासाठी प्लॅस्टीक पिशव्यांना पर्याय दुधपुरवठा करण्यासाठी सध्या प्लॅस्टीक पिशव्या वापरल्या जातात. पण त्यामुळे एकतर प्रदुषण होते, त्याच बरोबर भेसळ करण्याचे प्रमाण खुप जास्त होते. तसेच त्याची जबाबदारी देखील कोणीच घेत नाही. लहानमुलांसाठी दुध अत्यावशक आहे. अशा भेसळयुक्त दुधाचे त्यांनी सेवन केले तर त्यांच्या आरोग्यास हानिकारक आहे. 

या सर्वाला उपाय म्हणजे पॅक बंद टेट्रापॅक कंटेनरद्वारे दुधपुरवठा करणे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल आणि भेसळमुक्त दूध मिळेल. परदेशात असे पर्यावरण दूषित न  करणारे कार्ड बोर्डचे पॅकिंग असलेले दुध रोज पुरवले जाते. त्यांत भेसळीचे प्रकार होऊ शकणार नाही आणि आढळल्यास त्या डेअरीवर कायदेशीर कारवाई करण्याचा पर्याय आहेच. 

सध्या फळांच्या रसासाठी टेट्रापॅक कंटेनरसचा वापर बाजारात होताना दिसतो. मग दुधासाठी का नाही? तरी या पर्यायाचा विचार प्रशासनाने करावा. नागरिकांच्या आरोग्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. 
-दे. पु. नेरकर, पीएच.डी.(फुड टेक्नॉलॉजी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: use of tetra pack for milk is environment friendly