अहो काका, ते विमानवाले काका आलेत का?

विनायक बोरकर
Wednesday, 24 April 2019

काकांच्या पिशवीतून वेगवेगळ्या प्रकारची कागदी विमाने बाहेर पडत होती. एकेका हातामध्ये ती कागदी विमाने विसावल्यावर हे छोटे-छोटे पायलट ती विमाने घेऊन हिरवळीवर धावले. कोणाचे "जेट फायटर' तर कोणाचे "मिंग 21' तर कोणाचे 'सुखोई', तर कोणाचे "जम्बोजेट' हवाई भराऱ्या घेऊ लागले. मोठे विलोभनीय दृश्‍य होते. मधूनच कोणीतरी त्याच्याकडे येई, "काका माझे विमानच उडत नाहीये.'' मग काका "त्या' विस्कटलेल्या विमानाच्या घड्या पुन्हा बसवून देत. हवेत भरारी करायला सज्ज असे. विमान पुन्हा त्या चिमुकल्या हातातून अवकाशात भरारी घेत असताना त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावर पुन्हा प्रत्ययाचा आनंद उमटवून जाई. ​

पुणे : बाबूराव वाळवेकर उद्यानातील घटना. साधारण संध्याकाळचे साडेसात वाजले होते. "अहो काका, ते विमानवाले काका आलेत का?'' असा एक प्रश्न त्या निरागस चेहऱ्याने विचारला. क्षणभर त्याच्याकडे पाहिले हातात 'पॅम्प्लेट'चे कागद होते. असे दोन-तीन चेहरे हातात ते कागद घेऊन रेंगाळत होते. तेवढ्यात एक ज्येष्ठ नागरिक हातात एक पिशवी घेऊन आले. त्यांना पाहिल्यावर मुलांनी एकच गलका केला.

काकांच्या पिशवीतून वेगवेगळ्या प्रकारची कागदी विमाने बाहेर पडत होती. एकेका हातामध्ये ती कागदी विमाने विसावल्यावर हे छोटे-छोटे पायलट ती विमाने घेऊन हिरवळीवर धावले. कोणाचे "जेट फायटर' तर कोणाचे 'मिंग 21' तर कोणाचे 'सुखोई', तर कोणाचे 'जम्बोजेट' हवाई भराऱ्या घेऊ लागले. मोठे विलोभनीय दृश्‍य होते. मधूनच कोणीतरी त्याच्याकडे येई, "काका माझे विमानच उडत नाहीये.'' मग काका 'त्या' विस्कटलेल्या विमानाच्या घड्या पुन्हा बसवून देत. हवेत भरारी करायला सज्ज असे. विमान पुन्हा त्या चिमुकल्या हातातून अवकाशात भरारी घेत असताना त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावर पुन्हा प्रत्ययाचा आनंद उमटवून जाई. 

स्टेट बँकेतून निवृत्त झालेले श्रीनिवास नारविलकर नित्यनेमाने दररोज संध्याकाळी साडेसातच्या सुमारास आपल्यासोबतच्या कापडी पिशवीतून विविध प्रकारची ओरिगामीच्या पद्धतीने बनविलेली 15 ते 20 विमाने घेऊन येतात. तेथे उपस्थित असणाऱ्या 'बच्चे कंपनी'च्या हातात ती विसावतात. घरून आणलेल्या 'पॅम्प्लेट'चीही विमाने बसल्या बसल्या बनवून देतात. निवृत्तीनंतरचा विरंगुळा, मुलांच्या चेहऱ्यावर विलसणारा आनंद आणि बालपणातल्या पुनःप्रत्ययाचा क्षण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो. 'गॅझेट'मध्ये अडकलेल्या हातांना येथे मोकळीक मिळते. 
 

#WeCareForPune तुम्ही सजग नागरिक आहात का?
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vinayak Borkar is Writing Story about his Experience