वारजे हाय वे ठरु शकतो धोकदायक 

मंदार मोरे
रविवार, 6 जानेवारी 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

वारजे  : वारजे चौकात पुणे बेंगलोर हाय वे खाली सकाळी 8 ते 12 पर्यंत कामगार रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अश्या पद्धतीने उभे असतात. येथे वरुन हाय वे जातो. त्यावरून सतत जड वाहनांची ये जा चालू असते. एखाद्या अवजड वाहनाचा ब्रेक फेल होऊन जर तो खाली पडला तर मनुष्य जिवितहानी होण्याची शक्यता आहे. हा मजूर अड्डा पुढे असताना सर्व कामगार तिथे न थांबता इथे थांबतात. विशेष म्हणजे इथे वाहतुक पोलीस उभे असून काही बोलत नाही. तसेच बाजूला सिक्स सीटर रिक्षावाले पण थांबून ट्रॅफिक जाम करतात कृपया पुढील अपघात टाळण्यासाठी आत्ताच उपाययोजना करावी.
 

Web Title: Warje highway can be dangerous