#WeCareForKolhapur ‘आपलं शहर आपलं बजेट’मध्ये मांडा मते

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 February 2019

‘आपलं शहर, आपलं बजेट’ या उपक्रमांतर्गत कोल्हापुरातील नागरिकांनी आपली मते, नवी कल्पना, उत्पन्न वाढीसाठीचे काही नवीन मार्ग, शिक्षण, आरोग्य, डिजीटल अशा सुविधा या सर्वच पातळ्यांवर नेमके काय हवे, हे बिनधास्त मांडा.  

यावर पाठवा सूचना : 
९८२२९०७०४६ (डॅनियल काळे)
ईमेल - kolhapurnews@esakal.com

कोल्हापूर - महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करायचे काम सुरु आहे. या अंदाजपत्रकात लोकांना नेमके काय हवे आहे ?, शहराच्या विकासाच्या दृष्टीने नागरिकांच्या मनात नेमके काय आहे ?. शहराच्या विकासाच लोकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. यासाठीच आपल्या सूचना महापालिकेपर्यंत पोहोचवण्याचे काम ‘सकाळ’तर्फे करण्यात येणार आहे. 

‘आपलं शहर, आपलं बजेट’ या उपक्रमांतर्गत नागरिकांनी आपली मते, नवी कल्पना, उत्पन्न वाढीसाठीचे काही नवीन मार्ग, शिक्षण, आरोग्य, डिजीटल अशा सुविधा या सर्वच पातळ्यांवर नेमके काय हवे, हे बिनधास्त मांडा.    

लोकांचा विकासाच्या प्रक्रियेमधील सहभाग वाढवणारा हा उपक्रम असून यासाठी नागरिकांनी त्यांच्या सूचना व्हॉट्‌स ॲपवर व मेलवर आपल्या नाव, पत्ता, मोबाईल क्रमांकाची नोंद करून पाठवाव्यात. 

कोल्हापूर महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय येथे घेतले जातात. विकासासाठी निधीची तरतूद केली जाते. पण नागरिकांना नेमके काय हवे आहे आणि बजेटमध्ये त्याची तरतूद करता येईल का ? या दृष्टीने ‘सकाळ’ने आता पुढाकार घेतला आहे. महापालिका ही आपली सर्वांची संस्था आहे, ही संस्था टिकली पाहीजे, सक्षम झाली पाहिजे. त्याचबरोबर या संस्थेकडून शहराच्या विकासाला चालना मिळावी, अशाप्रकारे प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी काम करायला हवे. त्यासाठी लोकसहभाग ही महत्वाचा आणि आवश्‍कच आहे. 

लोकप्रतिनीधी, प्रशासन आणि जनता यामध्ये हा समन्वय साधण्यासाठी ‘सकाळ’ नेहमीच पुढाकार घेत असते. दरवर्षी आपले शहर, आपले बजेट ही पुस्तिका ‘सकाळ’कडून प्रसिद्ध केली जाते. या पुस्तिकेत लोकांनी दिलेल्या सूचना, अपेक्षा, योजनांचा समावेश असतो. अशा कांही योजनाचा समावेश महापालिकेने यापुर्वीही आपल्या बजेटमध्ये केल्या आहेत. त्यामुळे यंदाही अशीच पुस्तिका तयार करण्याचे नियोजन ‘सकाळ’कडून केले आहे. त्यासाठी समाजाच्या सर्व क्षेत्रातील व्यक्तींना या सूचना व आपला फोटो ‘सकाळ’कडे पाठवाव्यात. व्हॉट्‌स ॲपवर या प्रतिक्रिया स्विकारल्या जातील.

यावर पाठवा सूचना : 
९८२२९०७०४६ (डॅनियल काळे)
ईमेल - kolhapurnews@esakal.com


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We Care For Kolhapur join us in Citizen Journalism