फूटपाथची रुंदी वाढविण्याची गरज काय ?

अभिजीत जगताप
मंगळवार, 24 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : स्मार्ट सिटी प्रकल्पात सध्या पुण्याभर बरीच कामं सुरू आहेत. त्यातील एक मुद्दा फूटपाथची रुंदी वाढविण्याचा आहे. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्त्यावर हे काम करून झालं आहे. आता ह्या प्रकल्पा अंतर्गत लक्ष्मी रस्ता आणि कुमठेकर रस्त्या जोडणाऱ्या गल्ल्यांमध्ये देखील राबवण्यात येत आहे.

विजय नाट्यगृह आणि तथास्तुच्या गल्लीमध्ये एका बाजूला आता नवीन फूटपाथ टाकण्यात आला आहे. ह्या गल्लीमध्ये कायम वाहनांची गर्दी असते. एवढ्या छोट्या गल्ली फूटपाथची रुंदी वाढविण्याची गरज आहे का? त्यातून तथास्तुच्या समोरच्या कॉर्नरवर पण हा फूटपाथ वाढवण्यात आला आहे. याच्यामुळे कुमठेकर रस्त्यावरील वाहतूककोंडीला नक्की त्रास होणार आहे. प्रशासानाने याचा नक्की विचार करावा
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is the need to increase the width of foootpath