
तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या
पुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन केव्हा मुहूर्त काढणार? आता हिवाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. या गवत, राडा-रोडा, जलपर्णी, कचरा यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना, वाहनचालकांना डासांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने ताबडतोब या ठिकाणी स्वच्छता करुन सर्वांना होणार्या त्रासापासुन मुक्तता करावी.