तुकाईदर्शनच्या सांडपाण्याची जबाबदारी कोणाची?

तानाजी सातव
Monday, 21 January 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

हडपसर : सासवड-हडपसर महामार्गावर भेकराईनगर येथील सिग्नलच्या चौकात तुकाई दर्शन भागातुन नेहमी सांडपाणी वाहून येत असते. सिमेंट रस्ता आणि त्याच्या साईडपट्टयांमध्ये हे पाणी साठून राहते. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. पाणी साठल्यामुळे खड्डे लक्षात येत नाहीत. सांडपाण्यातुन एखादे वाहन वेगात गेल्यास शेजारुन जाणाऱ्या वाहनचालकांच्या अंगावर पाणी उडते. यातुन वादविवाद भांडणे होत असतात. याविषयी स्थानिक नागरिकांनी तक्रारी करुनही ग्रामपंचायत असताना दखल घेतली गेली नाही. आता महानगरपालिका प्रशासन डोळेझाक करीत आहे. अधिकाऱ्यांनी स्वत:हुन दखल घेऊन कारवाई करावी अशी अपेक्षा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who is responsible for the sewage treatment in tukai darshan