सेनापती बापट रस्त्यावर नवीन बसथांबा कशाला? 

प्रेमकिरण जोशी 
Tuesday, 13 August 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : प्रकाश भवन, सेनापती बापट रस्त्यावरील पीएमपीच्या बसथांब्यावरील सुस्थितीतील जुने बाकडे काही दिवसांपूर्वी काढून नवीन बसविण्यात आले. आता परत त्याच्या अलीकडे अजून एक नवीन बसथांबा बसविण्याचे काम सुरू आहे. काहीही गरज नसताना जुना थांबा काढला. नवीन थांबा बसवून पदपथाची दुरावस्था झाली आहे. नागरिकांच्या पैशाचा अपव्यय चालू आहे. खरेतर या थांब्याची कोणालाही गरज नाही, कारण लगेच पुढेच 100 मीटरवर चतुःश्रुंगी मंदिर थांबा आहे. या आर्थिक गणित जास्त असल्याची शंका येते. हा थांबा तातडीने काढला पाहिजे आणि पादचाऱ्यांना चालण्यासाठी योग्य रस्ता मिळवून दिला पाहिजे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: why new busstop on Senapati Bapat road?