परिहार चौकातील पदपथाचे काम अर्धवट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 January 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

औंध : औंध येथील महादजी शिंदे मार्ग ते परिहार चौक मार्गावर नव्याने हाती घेतलेले काम अर्धवट स्थितीत आहे. पदपथाच्या कामात ठेकेदाराने हलगर्जीपणा केल्याने कामे अर्धवट स्थितीत सोडून देण्यात आली आहेत. फळ विक्री करणाऱ्या गाळेधारकासमोरील पदपथ नव्याने तयार केला नाही. तसेच चेंबरची उभारणी धोकादायक रित्या केली आहे. अत्यंत वर्दळीच्या या मार्गावर वाहनचालक व पादचारी धोकादायक परिस्थितीत मार्गस्थ होत आहेत. काम त्वरीत पूर्ण करण्यासाठी पुढाकार कोण घेणार ? तरी चेंबर दुरुस्ती व पदपथाचे काम त्वरीत मार्गी लावण्याची गरज
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The work of the pavement of Parahar Chowk is partially