पावसाळ्यात आजारांपासुन संरक्षण देणारी योगासने

yoga in monsoon
yoga in monsoon

पावसाळ्याचा मोसम पुन्हा एकदा सरू झाला आहे आणि इंद्र-वरुण आदी पावसाच्या देवतांनी रम्य पावसाचे आशिवार्द आपल्याला दिल्याबद्दल आपण सर्वजण अतिशय आनंदीत झालेले आहेत. तथापि, आपल्याला हे देखील मान्य आहे की पाऊस हा तेव्हाच सुंदर भासतो, जेव्हा तो आपण घराच्या आत बसून खिडकीतून बघतो किंवा एखाद्या लांबच्या पावसाला फिरायला जाताना कारमधून अनुभवतो. पण तुम्हाला दैनंदिन कामे पार पडायची असतील, शाळा किंवा मिटींगला जाण्यासाठी बाहेर पडणे भाग असेल तर पावसाळा हा म्हणतात तेवढा रमणीय आणि सुंदर ऋतू वाटू शकत नाही.

पावसाळ्याच्या दिवसात उत्तम आरोग्य टिकवणे ही एक अडचण होऊन बसते. वर्षाच्या या कालावधीत आपल्याला अनेक प्रकारच्या आजारपणांना आणि तब्येतीच्या तक्रारींना सामोरे जाव लागते.

पावसाळ्यात भेडसावणाऱ्या काही आरोग्य समस्या आणि योगासनांच्या सहाय्याने त्या कशा दूर करता येतील ते आपण पाहूया :

१. संर्सग प्रादुर्भाव (इन्फेक्शन)
कडक उन्हानंतर एकदम दमट पावसाळी हवा असा वातावरणात बदल झाला की अतंगर्त संर्सग प्रादुर्भाव, ताप येणे हे पावसाळ्यात अगदी सामान्य असते. मलेरिया, टायफॉईड, डेंग्यू, विषाणूजन्य ताप इत्यादी या काळात उद्भवणारी विविध आजारपणे या मोसमाला अगदी कठीण बनवून टाकतात. आपल्या तब्येतीत अगदी किंचतही फरक जाणवला तरी आपण अतिशय दक्ष राहायला हवे. उतिष्ट पादांगुष्ठासन (पायाच्या चवड्यांवर उभे राहणे), बद्धसमकोनासन (दोन्ही पायांचा कोन करून उशीवर पाठीची कमान करून उताणे झोपणे), अर्धहलासन (पाठीवर झोपून पाय कंबरेपासून वर उचलणे) आणि प्रणायाम यांच्यामुळे वरील आजारांवर मात
करण्यास मदत होऊ शकते.

२. अंगदुखी
अनेकवेळा जेव्हा आपल्याला कसकस-कणकण जाणवते किंवा ताप येणार असतो तेव्हा अनेकप्रकारे अंगदखीला सामोरे जाव लागते, थकवा जाणवतो, ढगाळ पावसाळी हवेत पार उदासवाणे वाटते. पावसाळ्यामध्ये शरीरावर होणाऱ्या या विपरीत परिणामांसाठी योगासने हा उत्तम चपखल उपाय आहे. त्रिकोणासन, विरभद्रासन वीरभद्रासन, पश्चिमोत्तानासन, भुजांगासन आणि बद्धसमकोनासन हे अशावेळी उपयुक्त ठरतात.

३. अतिसार (जुलाब)
संर्सग प्रादुर्भावच्या जोडीला पावसाळ्यातील एक अगदी सर्रास होणारा आजार म्हणजे अतिसार (जुलाब). पावसाळ्याच्या दिवसात बाहेरील, उघडयावरील अन्नपदार्थांचे सेवन केल्याने पोट हमखास बिघडते. त्यापासून आराम मिळावा यासाठी पुढील आसन करून बघा: अधोमुखश्वानासन, मारिचासन, भरद्वाजासन आणि बालासन.

४. कावीळ
कावीळ ही प्रामुख्याने रक्तातील पित्तपद्रव्य प्रमाण वाढल्यामुळे उद्भवते. त्वचा फिकुटणे, पिवळी पडणे, डोळ्यांची बुब्बुळे पिवळसर होणे आणि त्वचा श्लेष्मल होणे ही काविळची लागण झाल्याची लक्षणे मानली जातात. 

काविळची लागण प्रामुख्याने गढूळ अशुध्द पाणी प्यायलाने होते. त्यामुळे आपण पावसाळ्यात बाहेरील अन्नपदार्थांच सेवन संपूणर्पणे टाळायलाच हवे. काविळच्या वेदना शमिवण्यासाठी पुढील आसने करून पाहा. आनंद बालासन, बध्दपद्मासन, मत्स्यासन, सर्वांगासन आणि धनुरासन.

नाडीशोधन आणि सूर्य- चंद्र भस्त्रिका, प्राणायाम यांच्या नियमित सरावाने शरीरातील संपूण यंत्राणा सुरळीत होण्यास तसेच रक्तशुध्दी होण्यास मदत होते. कपालभाती क्रिया पावसाळ्यातील नको असलेले विविध आजार दूर राखण्यास सहाय्यभूत ठरते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com