झेड ब्रिजवरील रस्त्याच्या कामात ढिसाळपणा

अभिजीत परांजपे
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : झेड ब्रिजवर आधी रस्ता सिमेंटचा होता मग त्यावर डांबर टाकण्यात आले. आता या पुलाच्या एका बाजूला (गावातून डेक्कन कडे जाणाऱ्या रस्त्यात) या डांबर टाकलेल्या रस्त्यावर एक नवीन प्रकल्प सुरू केला आहे. त्याकरीता रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. हे काम सुरू होऊन किमान २ आठवडे झाले आहेत. किती दिवस ही बाजू बंद ठेवणार आहेत? हा प्रकल्प दुसऱ्या बाजूला पण राबविताना देखील हा रस्ता बंद करणार. जे काम आत्ता सुरू आहे ते  आधीच जुन्या काँक्रिट रस्त्यावरच का नाही केले? ही सगळी कामं अत्यंत ढिसाळपणे, नियोजन न करता करण्यात येते आहे याची गोष्टीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे.

 

Web Title: Z bridge road work is improper