Utensils Cleaning Tips: करपलेली भांडी पुन्हा चमकवायची आहेत? मग या ट्रीक नक्की ट्राय करा

Utensils Cleaning Tips: किचनमध्ये स्वंयपाक करत असताना अनेकदा आपण इतर कामांमध्ये गुंतून जातो आणि मग कधी भात करपतो तर कधी भाजी. कधी दूध उतू जातं तर कधी तेल जास्त तापतं. अशावेळी आपली अनेक भांडी ही अगदी काळी होतात. त्यावर उपाय काय....
Utensils Cleaning Tips
Utensils Cleaning TipsEsakal

Utensils Cleaning Tips: किचनमध्ये स्वंयपाक करत असताना अनेकदा आपण इतर कामांमध्ये गुंतून जातो आणि मग कधी भात करपतो तर कधी भाजी. कधी दूध उतू जातं तर कधी तेल जास्त तापतं. अशावेळी आपली अनेक भांडी ही अगदी काळी होतात. त्यांच्यावर कार्बनचा थर जमा होतो.

काही वेळा चपात्या किंवा भाकऱ्या करून तवा लाल काळा होतो. तसचं आपण वापरत असलेली वेगवेगळी भांडी सतत स्वयंपाक केल्याने अनेकदा काळी होतात. अशावेळी आपण तारेच्या बोळ्याने कितीही साबण लावून भांडी घासली तरी ती म्हणावी तशी पुन्हा चमकत नाही.  Smart Tips and Ingredients to clean blackened utensils Kitchen tips in marathi

स्वयंपाक Kitchen घरात आपण वेगवेगळ्या प्रकारची भांडी वापरत असतो. यातील अनेक भांडी रोजच्या वापरात जेवण शिववण्यासाठी रोजच वापरली जातात. कालांतराने ही काळी झालेली भांडी किचनची शोभा कमी करतात तर काही भांडी लवकरच जेवण Food शिवण्यासाठी अयोग्य होतात.

अशावेळी तारेचा बोळा वापरून ती भांडी स्वच्छ होत नसतील तर काही घरगुती ट्रीक्स वापरून तुम्ही ती पुन्हा एकदा चमकवू शकता. या ट्रिक्स कोणत्या हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

  1. कांद्याच्या मदतीने भांडी चमकवा

कांद्याचा वापर आजवर आपण केवळ स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी करत आलो आहोत. पण तुम्हाला माहित आहे का कांद्याचा उपयोग करून तुम्ही काळी झालेली आणि करपलेली भांडी स्वच्छ करू शकता. कांद्याचा वापर भांडी स्वच्छ करण्यासाठी कसा करावा हे जाणून घ्या 

  1. कांदा आणि विनेगर- स्वयंपाक घरातील भांडी जर खुपच काळी झाली असतील तर कांदा आणि विनेगरचा एकत्र वापर करा.  यासाठी अर्धी वाटी व्हाईट विनेगरमध्ये कांद्याचा रस मिसळा. हे मिश्रण करपलेल्या भांड्याला सर्व बाजुंनी नीट पसरवून लावा. त्यानंतर जवळपास १५ मिनिटं हे मिश्रण भांड्यावर वाळू द्या त्यानंतर ब्रशने भांड घासून पाण्याने धुवा. यामुळे तुमचं भांड एकदम स्वच्छ होईल.

  2. कांदा आणि बेकिंग पावडर- काळी, करपलेली भांडी आणि तवे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कांदा आणि बेकिंग पावडरही वापरू शकता. यासाठी करपलेल्या भांड्यावर एक छोटा चमचा बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा पसरवून घ्या स्क्रबने ते भांड घासा. त्यानंतर एक अर्धा कापलेला कांदा घेऊन भांड्याला कांद्याने स्क्रब करा. त्यानंतर या भांड्यात गरम पाणी टाका यामुळे भांड्यावरी डाग दूर होण्यास मदत होईल.

  3. कांद्याची साल- स्वयंपाकासाठी कांदा वापरत असताना आपण कांद्याची साल ही कचऱ्यात फेकून देतो. मात्र हिच साल तुमची भांड स्वच्छ करण्यास मदत करू शकतं.  बऱ्याचदा चहाचं पातेल तसचं पदार्थ तळण्यासाठी वापरण्यात येणारी कढई कालांतराने आतून लाल आणि काळी होते. अशी भांडी स्वच्छ करण्यासाठी त्या भांड्यात पाणी घ्या त्या काही कांद्याची सालं टाका. आता हे पाणी अर्धा तास उकळू द्या. त्यानंतर हे भांड स्क्रबरने घासून पाण्याने स्वच्छ करा. यामुळे भांड चांगलं चमकू लागेल. 

Utensils Cleaning Tips
Kitchen Tips : तुम्हीही ब्रेडची पहिली अन् शेवटची स्लाइस फेकून देतात?

याशिवाय किचनमधीलच सहज उपलब्ध होणाऱ्या इतर काही सामुग्रीच्या मदतनेही काळी झालेली भांडी चमकवणं सहज शक्य आहे.

मिठाने स्वच्छ करा भांडी : दूध किंवा चहाचं भांड करपलं असेल तर त्यासाठी या भांड्यामध्ये पाणी भरा. यात एक चमचा मीठ आणि काही ड्रॉप भांडी घासण्याच्या लिक्विडचे टाका. हे पातलं गॅसवर ठेवून पाण्याला फक्त उकळी घ्यावी. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस लगेचच बंद करावा. त्यानंतर एक तास हे पाणी भांड्यात राहू द्यावं. त्यानंतर भांड बोळ्याने घासून घ्यावं. यामुळे तुमचं भांड अगदी स्वच्छ होईल. 

लिंबाचा रस: लिंबाच्या रसामध्ये असलेल्या सट्रिक ऍसिडमुळे काळी झालेली आणि करपलेली भांडी स्वच्छ होण्यास मदत होते. लिंबाला भांड्यावरील करपलेल्या भागावर चांगलं रगडावं, त्यानंतर भांड्यात एक ग्लास गरम पाणी टाकावं.

५ मिनिटांनी हे भांड पुन्हा चांगल घासून धुवून घ्यावं यामुळे पुन्हा चमकू लागेल. यासोबतच अनेकदा अल्युमिनियमचा कुकर आतून काळा होतो. अशा वेळी तुम्ही कुकरमध्ये डब्ब्याचा वापर करून डाळ किंवा भात शिवत असताना कुकरमध्ये टाकलेल्या पाण्यात वापरलेलं अर्ध लिंबू तुम्ही टाकू शकता. यामुळे कुकर आतून काळं होणार नाही आणि स्वच्छ राहिलं. 

Utensils Cleaning Tips
Utensils Cleaning Tips: कितीही घासली तरी काळीच पडतात? या मॅजिक ट्रिकने चमकवा तांब्या पितळेची भांडी

टोमॅटोचा वापर फायदेशीर-  भांड स्वच्छ करण्यासाठी तुम्ही टोमॅटो किंवा टोमॅटोचा रसही वापरू शकता. यासाठी जळालेल्या भांड्यामध्ये पाण्यासोबत तुम्ही टोमॅटोचा रस किंवा अर्ध्या टोमॅटोचे तुकडे टाका. हे पाणी १५ मिनिटं उकळू द्या. त्यानंतर भांड घासून घ्या. यामुळे जळालेले डाग निघून भांड स्वच्छ होईल. clean utensils easily

बेकिंग सोडा आणि विनेगर: बेकिंग सोडा आणि विनेगर हे कॉम्बिनेशन भांडी चमकवण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. अनेक घरांमध्ये बेकिंग सोडा आणि विनेगर किचनमध्ये उपलब्ध असतं. यासाठी जळालेल्या भांड्यामध्ये पाणी घेवून त्यात दोन चमचे विनेगर मिसळा.

लक्षात घ्या भांड मोठं असेल तर विनेगरचं प्रमाण वाढवावं लागेल. त्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात दोन चमचे बेकिंग सोडा टाका आणि गॅस बंद करून हे पाणी १५ मिनिटं भांड्यात राहू द्या. १५ मिनिटानी भांड घासून पाण्याने धुवून घ्या. यामुळे तुमचं भांड अगदी नव्या सारखं चमकू लागेल. आठवड्यातून एकदा तुम्ही भांडी या प्रकारे घासल्यास त्यांची चमक कायम राहिल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com