Kitchen Tips : Fridge मध्ये ठेऊनही भाज्या खराब कशा होतात? हे घ्या उत्तर

फळ आणि भाज्या एकत्र ठेवताय का? मग हे वाचाच
Storing Fruits And Vegetables Together Tips and Tricks
Storing Fruits And Vegetables Together Tips and Tricksesakal

Kitchen Tips : शी बाई, सकाळी बनवलेली भाजी संध्याकाळी खराब होतेय भाताला पाणी सुटतयं, हा उन्हाळा अल्हाददायक असला तरी असं नुकसान करतोय, त्यामूळे सगळं फ्रिजमध्ये ठेवाव, अशी रड प्रत्येक घरात येत असते. कारण, उन्हामुळे फळ, भाज्याही खराब होतात. उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा सगळ्यात जास्त गरज Fridge ची असते. पण, काहीवेळा फ्रिजमधील पदार्थही खराब होतात.

उन्हाळ्याच्या दिवसात सगळ्यात जास्त नुकसान हे आपल्या खाद्य पदार्थांच होत असतं. भाज्या आणि फळ Fridgeमध्ये ठेवल्या तरी त्या खराब होतात. असं का बरं होत असेल. याबद्दल जाणून घेऊयात.

Storing Fruits And Vegetables Together Tips and Tricks
Kitchen Tips : शिट्टी झाली की कुकरमधलं सगळं पाणी बाहेर येतंय? ट्राय करा मास्टरशेफ पंकजचा हा हॅक

भाज्या आणि फळांमध्ये विविध प्रकारचे एंजाइम आणि रसायने असतात. अशा परिस्थितीत इथिलीन निर्माण करणाऱ्या फळांसोबत भाजीपाला ठेवल्यास त्या लवकर कुजायला लागतात. त्यामुळेच आज अशा कोणत्या भाज्या आणि फळं आहेत जे एकमेकांसोबत ठेवणं महागात पडू शकतं हे पाहुयात.

Storing Fruits And Vegetables Together Tips and Tricks
Kitchen Tips : स्वयंपाकघरातला LPG गॅस कसा वाचवाल ?
फळांमुळे खराब होतात भाज्या
फळांमुळे खराब होतात भाज्याesakal

ब्रोकोली

ब्रोकोली इथेलीन पदार्थांपासून दूर ठेवावी लागते. त्यामुळे तिच्यासोबत इथेलिन युक्त फळे ठेवली तर ती लकवर खराब होतात. फ्रिजमध्ये ब्रोकोलीसोबत सफरचंद, अंजीर, द्राक्षे यांसारखी इथेलीनयुक्त फळे ठेवली तर ब्रोकोली दोन दिवसातच कोमेजते.

पालेभाज्या

पालेभाज्या फ्रिजमध्ये जास्तवेळ ठेऊ नयेत. त्या ताज्या असतानाच खाव्यात. पण, जर अगदीच गरज असेल तर फ्रिजमध्ये इथेलिन असलेल्या फळांसोबत ठेऊ नये. कोणतीही पालेभाजी टरबूज, द्राक्षे, सफरचंद यांसारख्या फळांसोबत ठेवणे टाळावे.

दुधी

दुधीच्या भाजीला इथेलिनची ऍलर्जी आहे. त्यामूळे फ्रिजमध्ये सफरचंद, द्राक्षे, अंजीर, नाशपाती यांसारख्या फळांसह ठेवू नये. कारण या फळांमध्ये अति प्रमाणात इथेलीन असते. त्यामुळे सफरचंद, खरबूज, किवी यांसारख्या इथिलीन उत्पादक फळांपासून भाज्या दूर ठेवाव्यात.

Storing Fruits And Vegetables Together Tips and Tricks
Kitchen Tips : फ्रिजमध्ये ठेवूनही मळलेली कणीक काळी पडते, अशी करा स्टोअर, 2 दिवसानंतरही पोळी बनेल फ्रेश
भाज्या हवाबंद डब्यातच ठेवाव्यात
भाज्या हवाबंद डब्यातच ठेवाव्यातesakal

कोबी

कोबी प्रोटीन आणि फायबरयुक्त असतो. त्याचे सेवन करणे आरोग्यासाठी, वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी चांगले मानले जाते.त्यामूळे कोबी फ्रेश असेल तेव्हाच खाऊन संपवावा. पण स्टोअर करणार असाल तर सफरचंद, खरबूज, किवी यांसारख्या फळांपासून दूर ठेवावा.

उन्हाळ्यात भाज्या टिकाव्या म्हणून हे उपाय करा

  • भाज्या पिशवीत न ठेवता हवाबंद डब्यात ठेवाव्यात. अगदीच घाई असेल तर तुम्ही प्लास्टिकची जाड पिशवी वापरू शकता.

  • ब्लांचिंग म्हणजेच भाज्या गरम पाण्यात उकळवणे. पालेभाज्यांच्या बाबत हा पर्याय वापरल्याने भाजी टिकून राहायला मदत होते.

  • भाजी पूर्ण शिजवण्याची गरज नाही केवळ हलकी वाफ देऊन मग फ्रीज मध्ये थंड करण्यासाठी स्टोअर करू शकता.

  •  पालेभाज्या, कोथिंबीर, मिरची नीट निवडून वर्तमानपत्रात गुंडाळून मग प्लॅस्टीकच्या डब्यात घालून फ्रिजमधे ठेवाव्यात.

  • आलं आणि लसणाची पेस्ट चांगली रहावी यासाठी ती सोलून स्वच्छ धुवून, तव्यावर थोडावेळ परतून घ्या.आणि मग किंचित मीठ लावून मग त्यांची पेस्ट करुन फ्रिजमध्ये ठेवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com