ग्राहकांनी 'ऑनलाईन बँकिंग' सेवांचा वापर करावा:आयबीए

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशभरात झालेल्या परिणामाच्या पार्श्वभूमीवर इंडियन बँक असोसिएशन (आयबीए) आणि सदस्य बँकांकडून ग्राहकांना अखंडित सेवा पुरविण्यात येणार आहे. मात्र ग्राहकांनी गरज असेल तरच बँकेत येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशभरात झालेल्या परिणामाच्या पार्श्वभूमीवर इंडियन बँक असोसिएशन (आयबीए) आणि सदस्य बँकांकडून ग्राहकांना अखंडित सेवा पुरविण्यात येणार आहे. मात्र ग्राहकांनी गरज असेल तरच बँकेत येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या कोरोनामुळे ज्या अडचणींना सर्वांना सामोरे जावे लागत आहे त्याचप्रमाणे कर्मचारीदेखील सामोरे जात आहेत आणि त्यामुळेच ग्राहकांनी डिजिटल व्यवहार करण्यावर अधिक भर देण्याची विनंती देखील बँकांकडून करण्यात येत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बॅंकांकडून पुरवल्या जाणाऱ्या बहुतांश सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध आहेत. त्यामुळे ऑनलाईन बॅंकिंग सेवा चोवीस तास कार्यरत आहेत. तसेच मदतीची आवश्यकता असेल तर बँकेच्या कॉल सेंटरच्या माध्यमातून 'आयव्हीआर' सेवेचा वापर करू शकणार आहे.

बँकेत कॅश डिपॉझिट, पैसे काढणे, चेक वटवणे, रेमिटन्सेस आणि सरकारी व्यवहारासंबंधित कार्ये सुरू राहणार आहेत. मात्र या कालावधीत इतर अनावश्यक सेवा उपलब्ध होणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

लोहगावसह देशातील 80 विमानतळ 31 मार्चपर्यंत राहणार बंद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Customers should use Online Banking services IBA