लोहगावसह देशातील 80 विमानतळ 31 मार्चपर्यंत राहणार बंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोहगाव विमानतळासह देशातील 80 विमानतळांवरील कामकाज 25 ते 31 मार्च दरम्यान बंद राहणार असल्याचे केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केले.

पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोहगाव विमानतळासह देशातील 80 विमानतळांवरील कामकाज 25 ते 31 मार्च दरम्यान बंद राहणार असल्याचे केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनामुळे देशांतर्गत विमान वाहतूक मंगळवारपासून बंद झाली आहे. फक्त कार्गोची विमान वाहतूक सुरू आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकही बंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळांवरील कामकाज बंद करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने मंगळवारी प्रसिद्ध केली. सर्व विमान वाहतूक कंपन्यांनी त्यांची वाहतूक 24 मार्च रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटापर्यंत पूर्ण करावी, अशी सूचना त्यांना करण्यात आल्याची माहिती विमान वाहतूक मंत्रालयाने दिली आहे. 

पुण्यात किराणा दुकाने सुरू रहाणार; गर्दी न करण्याचे आवाहन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eighty airports closed till March 31 include lohegaon