esakal | coronavirus - युकेचे पंतप्रधान रुग्णालयात, जनता घरात बसून... 
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Jadhav

लॉकडाऊनमुळे यूके देश ठप्प झालाय. अशाही स्थितीत सरकार लोकांना धीर देत या संकटातून लवकरच बाहेर पडू, असा विश्वास देत आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचे प्रचंड पुरस्कृर्ते असलेल्या या देशातील लोक आज घराबाहेर पडू शकत नाहीत. याबाबत यूकेच्या मिल्टन केन्समध्ये वास्तव्यास असलेले नरेंद्र जाधव यांच्याशी ‘सकाळ'ने साधलेला संवाद. 

coronavirus - युकेचे पंतप्रधान रुग्णालयात, जनता घरात बसून... 

sakal_logo
By
योगेश सारंगधर, औरंगाबाद

एकेकाळी जगावर राज्य करणारा देश यूके (युनायटेड किंगडम) आज कोरोनाच्या संकटामुळे घरात बंद झालाय. साडेसहा कोटींहून अधिक लोकसंख्येच्या या देशात ५० हजारपेक्षा जास्त कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण असून, आतापर्यंत तीन हजार सातशे जणांना जीव गमवावा लागला आहे. या देशाच्या पंतप्रधानांनाच कोरोना विषाणूने जखडून ठेवत रुग्णालयात पाठविलेय.

प्रश्न - सध्या यूकेमध्ये काय स्थिती आहे? 
नरेंद्र जाधव - यूके सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे; परंतु लोक अन्न आणि औषधांसाठी बाहेर जाऊ शकतात. मात्र, सहा फुटांचे अंतर ठेवणे बंधनकारक आहे. सरकारने घरी रहा, एनएचएसचे संरक्षण करा, जीवन वाचवा, असा नारा दिला आहे. नॅशनल हेल्थ सव्हिर्सेस (एनएचएस) ही सरकारची सार्वजनिक आरोग्य संस्था आहे. सरकारने नागरिकांना काही सूचना केल्या आहेत. जे काम घरी शक्य नाही, त्यांनाच बाहेर जाता येते. 

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार...  

प्रश्न - घराबाहेर पडल्यास कोणती शिक्षा मिळते? 
नरेंद्र जाधव - बाहेर गेलात तरी इतर लोकांपासून दूर राहावे, घरी येताच हात धुवावेत, मित्रांना, नातेवाईकांना भेटू नये, अशा सरकारच्या सूचना आहेत. दोन आठवड्यांपासून आम्ही सरकारच्या सर्व मार्गदर्शनाचे काटेकोर पालन करतोय. पुढचे काही आठवडे लॉकडाऊन सुरू राहील. यूकेची जनता सरकारच्या नियमांचे उत्तमरीत्या पालन करीत आहे; पण जर नियम मोडला तर आर्थिक दंड ठोठावला जातो. पोलिस बाहेर आलेल्या लोकांची चौकशी करतात. योग्य कारण सांगता न आल्यास पोलिस त्या व्यक्तीला घरी घेऊन जाण्यासाठी प्रसंगी बळाचा वापर करतात. 

प्रश्न - तुमच्या कुटुंबावर काय परिणाम झालाय? 
नरेंद्र जाधव - आम्ही २०१३ पासून यूकेच्या मिल्टन केन्समध्ये कुटुंबातील चार सदस्यांसह राहतोय. मी औरंगाबाद येथून संगणक विज्ञान शाखेतून अभियांत्रिकीची पदवी घेतली. सध्या येथील आयटी कंपनीत नोकरी करतोय. कोरोनामुळे घरातूच काम सुरू आहे. यापूवीर्ही मी घरातूनच बहुतेक काम करू शकत होतो. त्यामुळे माझा दिनक्रम फारसा बदलला नाही. माझा मुलगा विद्यापीठात शिक्षण घेतोय, तर मुलगी दहावीत आहे. सध्या हे दोघेही घरी आहेत. परिस्थिती सुधारेपर्यंत विद्यापीठ व शाळा बंद राहतील. मात्र, मुलांचा अभ्यास विद्यापीठ आणि शाळांच्या पोर्टलद्वारे सुरू आहे. 

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय...

प्रश्न - भारतात परिस्थिती बिघडेल असे वाटते का? 
नरेंद्र जाधव -लॉकडाऊनसह कोरोना विषाणूचा प्रसार कमी करण्यासाठी भारतात चांगल्या उपाययोजना केल्या जात आहेत. भारतात या विषाणूच्या परिणामाची गंभीरता लोकांनी समजून घेतली पाहिजे. लोकांनी एकत्रित येणे, भेटणे टाळले पाहिजे. घरीच राहून तुम्ही कुटुंबाला, देशाला वाचवू शकता. सरकारच्या सल्ल्याचे गांभीर्याने पालन करणे आवश्यक आहे. 

प्रश्न - कोरोना विषाणूमुळे जग थांबलेय. पुढे काय होईल? 
नरेंद्र जाधव - जगातील बऱ्याच भागात लॉकडाऊन आहे. त्यामुळे या देशांची अर्थव्यवस्था प्रभावित झाली आहे. उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढणार आहे. 
 

loading image
go to top