जनता कर्फ्यू मध्ये काय होणार तुम्हाला माहित आहे का ? वाचा सविस्तर.

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या (रविवारी) सकाळी सात ते रात्री नऊ वाजपर्यत सर्व देशवाशियांना जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

कोल्हापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या (रविवारी) सकाळी सात ते रात्री नऊ वाजपर्यत सर्व देशवाशियांना जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी सायंकाळी पाच वाजता महापालिकेच्या सहा फायर स्टेशनवरुन सायरन वाजविण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व कोल्हापूरकरांनी खिडकीत, बाल्कनीत उभे राहून टाळ्या, घंटी वाचवून आरोग्यदूतांचे आभार मानावेत, असे आवाहन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे. 

सोमवारपासून महापालिकेत येणाऱ्या प्रत्येकाचे थर्मल स्कॅनर मशीनद्वारे तापमान चेक करण्याच्या सूचना आरोग्याधिकाऱ्यांना दिल्या. अलगीकरण कक्षासाठी आणखीन रुमची आवश्‍यकता भासल्यास त्याची तयारी आताच करुन ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घ्या. त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. प्रत्येक ऑफिसमध्ये साबण अथवा हॅन्डवॉशची सोय उपलब्ध करुन ठेवावी, असे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रणजित चिले यांनी सांगितले. शहरामध्ये रात्री व दिवसा गर्दीच्या ठिकाणी लोकांना घरी जाण्याबाबत गाडीवरून आवाहन केले जाणार आहे. त्यासाठी दोन गस्तीपथक तयार करण्यात आली आहेत. 
दरम्यान, आरोग्य विभागाचे 1900 कर्मचारी, पवडी विभागाचे 700 कर्मचारी, अग्निशमन विभागाचे 40 कर्मचारी व सर्व खातेप्रमुख कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कार्यरत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appeal to follow janta curfew in kolhapur