कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची लागण कोणाला ही नाही ; सीपीआरमध्ये 450 जणांची तपासणी...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

विविध भागात परदेशाहून आलेले किंवा त्यांच्या संपर्कात असलेल्या सर्वच व्यक्तींची तपासणी महापालिका वैद्यकीय पथक, सीपीआर वैद्यकीय पथक तसेच ग्रामीण आरोग्य केंद्रांचे या पथकाकडून शहर व ग्रामीण भागात होत आहेत. अनेकजण स्वतःहून अशा तपासणीसाठी पुढे आले आहेत.

कोल्हापूर - परदेशात जावून आलेल्या 450 हून व्यक्तींची सीपीआर रूग्णालयात कोरोनाची तपासणी झाली. यापैकी ज्यांना करोना सदृष्य लक्षणे दिसत होती, अशांचे स्वॅप तपासणीसाठी पाठविले होते. त्या सर्वांचे म्हणजे 50 जणांचे स्वॅप निगेटीव्ह आले आहेत. तर गेल्या दोन दिवसांत 34 व्यक्तींच्या स्वॅपचे अहवाल येत्या दोन दिवसात येतील. त्यामुळे परदेशावरून आलेले सरसकट सगळेच संसर्गीत नाहीत ही बाब ठळकपणे पुढे आली आहे. 

विविध भागात परदेशाहून आलेले किंवा त्यांच्या संपर्कात असलेल्या सर्वच व्यक्तींची तपासणी महापालिका वैद्यकीय पथक, सीपीआर वैद्यकीय पथक तसेच ग्रामीण आरोग्य केंद्रांचे या पथकाकडून शहर व ग्रामीण भागात होत आहेत. अनेकजण स्वतःहून अशा तपासणीसाठी पुढे आले आहेत. तपासणी वेळी ज्यांना घसा दुखी, ताप, सर्दी, खोकला जास्त खोकला अशी तीव्र स्वरूपांची लक्ष दिसत आहेत. त्याचे स्वॅप सीपीआर रूग्णालय मार्फत पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेकडे पाठविले जातात. त्यानुसार आजवर सिपीआरमध्ये परदेशातून आलेल्या ज्या व्यक्तींमध्ये करोना सदृष्य लक्षणे दिसली त्यांचे स्वॅप तपासणीसाठी पाठविले तर उर्वरितांना होम कोरंटाईन करण्यात आले. 

वाचा - कोल्हापूर जिल्हा बाजार समितीत काय आहे भाजी पाल्याची स्थिती...? जाणून घ्या...  

खबरदारी म्हणून घरीच थांबावे... 

सीपीआरमध्ये कोरोना तपासणी कक्ष सुरू झाल्यापासून मंगळवार (ता.24) पर्यंत पाठविलेले यापैकी सर्व म्हणजे 50 स्वॅप निगेटीव्ह आले आहेत, गेल्या दोन दिवसात आणखी 34 स्वॅप पाठविले आहेत. त्याचाही अहवाल येत्या दोन दिवसात येणार आहे. तरीही खबरदारीचा भाग म्हणून तपासणी झालेल्या व त्यांच्या संपर्कातील अन्य व्यक्तीनी घरीच थांबणे आवश्‍यक आहे. ज्यांची तपासणी झाली त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक अजूनही लक्ष ठेवून आहे. अशी माहिती राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गझभिये यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Kolhapur district no one Corona infected