Coronavirus : बाहेर पडू नका!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांच्या चाहत्यांना ‘जनता कर्फ्यू’चे पालन करण्याचे आवाहन केले आहे. 

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांच्या चाहत्यांना ‘जनता कर्फ्यू’चे पालन करण्याचे आवाहन केले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘‘मी नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला पाठिंबा देतो. उद्या (रविवारी) सायंकाळी पाच वाजता घराच्या खिडकी, दरवाजात किंवा गच्चीवर जाऊन टाळ्या, शिट्या किंवा घंटा वा शंख वाजवून कठीण परिस्थितीतही स्वतःच्या जिवाची पर्वा न करणाऱ्या निःस्वार्थी लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणार आहे,’ असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले आहे.

नागरिकांचा निष्काळजीपणा
घरात विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या व्यक्ती घराबाहेर फिरत असल्याचा प्रकार पनवेलमधील कामोठे वसाहतीत समोर आला. अचानक टाकलेल्या धाडीत हा प्रकार उघडकीस आला. या तिन्ही व्यक्तींना या पथकाने ताब्यात घेतले.

थुंकणाऱ्यांना दणका
मुंबई महानगरपालिकेने थुंकणाऱ्यांच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. शनिवारी महापालिकेने ११५ जणांवर कारवाई करून एक लाख १५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.

‘मुंबई मेट्रो’ आज बंद
‘जनता कर्फ्यू’मुळे रविवारी (ता. 22) घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. मेट्रो वनची ‘अप’ आणि ‘डाऊन’ अशा दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्णत: बंद राहील.

बेस्ट सेवा ‘बेस्ट’च!
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुंबईची जीवनवाहिनी असलेली बेस्ट मुंबईकरांच्या सेवेसाठी तत्पर आहे. संकट काळात बेस्टचे चालक, वाहक सेवा देत असल्याने ‘बेस्ट’ ही बेस्टच ठरली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amitabh bachchan talking Dont quit home for coronavirus