Coronavirus : सकाळ रिलीफ फंड : आवाहन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

मदत करण्यासाठी
HDFC Bank 
A/C No : 57500000427822 
IFSC : HDFC0000103 
या खात्यावर रक्कम ऑनलाइन पद्धतीने ट्रान्स्फर करून देणगी देऊ शकता. 

www.sakalrelieffund.com या संकेतस्थळावर जाऊन ‘डोनेट नाऊ’वर क्‍लिक करून डेबिट वा क्रेडिट कार्डच्या साह्याने आपली देणगीची रक्कम पाठवू शकता. या संकेतस्थळावर आपल्याला या ट्रान्झॅक्‍शनची पावतीही प्रिंट करता येईल.

अधिक माहितीसाठी - WhatsApp No. : 9960 500 143

‘सकाळ रिलीफ फंड’साठीच्या देणग्या प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमान्वये प्राप्तिकर सवलतीस पात्र आहेत.

संपूर्ण जगात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या महामारीच्या विरोधात सारे जग एकवटते आहे. भारतातही या साथीचा फैलाव रोखण्यासाठी शक्‍य ते सारे उपाय योजले जात आहेत. या साथीचा प्रसार हवेतून होतो आणि लोकांचा एकमेकांतील संपर्क टाळणे, कमीत कमी करणे हाच साथ रोखण्यावर उपाय आहे हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. या साथीवर निश्‍चित औषध योजना नसल्याने कोरोना विषाणूंची लागण होणार नाही याची दक्षता घेणे हाच उपाय आहे. त्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होतच आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगभरातील अनुभव पाहता ही साथ तिसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोका असतो. साथ प्रसाराच्या ज्या टप्प्यावर आपण उभे आहोत त्या टप्प्यावर प्रसार रोखण्यासोबतच उपचारासाठीच्या सुविधांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता महत्त्वाची असते. कोरोनाचा प्रसार हे देशासमोरचे आजघडीचे सर्वात मोठे संकट आहे. आणि त्याला तोंड देताना अशा मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे आवश्‍यक आहे. त्यात विलगीकरणासाठी आवश्‍यक त्या सुविधांपासून ते व्हेंटिलेटरपर्यंत अनेक उपकरणे लागतील. सरकार आपल्या स्तरावर यासाठी आवश्‍यक ते करेलच; मात्र अशा संकटसमयी लोकांनीही मदतीचा हात पुढे करणे आवश्‍यक असते.

‘सकाळ रिलीफ फंड’ अशा कोणत्याही संकटाच्या काळात नेहमीच पुढाकार घेत आला आहे. या वेळीही अत्यावश्‍यक वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यात तसेच विषाणूच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना विषाणूशी मुकाबला करण्याचे बळ देताना आवश्‍यक तेथे काही जीवनावश्‍यक वस्तू पुरवण्यात पुढाकार घ्यायचे ‘रिलीफ फंडा’च्या वतीने ठरविले आहे. ‘सकाळ’च्या वतीने रु. २५ लाखांचा निधी देऊन या फंडाची सुरुवात करण्यात येत आहे. प्रत्येक कसोटीच्या क्षणी ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या माध्यमातून समाजासाठी आपण सढळ हाताने मदत करताच; या वेळीही आपण अशीच मदत करावी, अशी अपेक्षा आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appeal by Sakal Relief Fund for Coronavirus