The CA exam was postponed because of Coronavirus breakdown
The CA exam was postponed because of Coronavirus breakdown

Corona Virus : कोरोनामुळे 'सीए' परीक्षा ढकलली पुढे; पहा केव्हा होणार परिक्षा?

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सनदी लेखापाल (सीए) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मे महिन्यात होणारी ही परिक्षा आता जून-जुलै महिन्यात होणार असल्याची माहिती दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) परिपत्रक काढून ही माहिती दिली आहे.

'आयसीएआय'कडून मे महिन्यात परिक्षांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे देशात भीतीचे वातावरण आहे. त्यात केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे सीए परीक्षा लांबणीवर पडली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

२ मे ते १८ मे या कालावधीत होणाऱ्या फौंडेशन कोर्स (नवीन अभ्यासक्रम), इंटरमीजीएट कोर्स (नवा व जुना अभ्यासक्रम), फायनल कोर्स (जुना व नवा अभ्यासक्रम), इंटरनॅशनल ट्रेड लॉ अँड वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल टॅक्सेशन या सर्व परीक्षा आता २० जून ते ३ जुलै २०२० या कालावधीत होणार आहेत.

शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी; पीककर्ज परतफेडीला मुदतवाढ!

अधिक माहितीसाठी 'आयसीएआय'चे संकेतस्थळ किंवा पुणे शाखेशी संपर्क करण्याचे आवाहन 'आयसीएआय' पुणेचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com