coronavirus:राज्यभरात कोरोनाचे 350 नवे रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 April 2020

पुणे, मुंबईसह राज्यभरात मंगळवारी कोरोनाचे नवे साडेतीनशे रुग्ण आढळून आले आहेत. तर 18 जणांचा बळी गेला असून, मृतांची एकूण संख्या 178 झाली आहे.

पुणे - पुणे, मुंबईसह राज्यभरात मंगळवारी कोरोनाचे नवे साडेतीनशे रुग्ण आढळून आले आहेत. तर 18 जणांचा बळी गेला असून, मृतांची एकूण संख्या 178 झाली आहे. त्याचवेळी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 259 झाली आहे. राज्यात आजघडीला 2 हजार 684 इतके रुग्ण आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मृतांमध्ये मुंबईतील 11, पुणे चार आणि औरंगाबाद, नगरमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्यात 11 पुरुष आणि सात महिला आहेत. त्यातही 27 वर्षाच्या तरुणाचा समावेश आहे. या लोकांना उच्चरक्तदाब, मधुमेह, अस्थमा, हदयरोग, मूत्रपिंडाचे आजार असल्याचेही तपासण्यातून निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत तपासणीसाठी पाठविलेल्या 46,588 पैकी 42,808 हजार जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 2 हजार 684 जणांना कोरोना झाला आहे. त्यापैकी 259 जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

पुणेकरांनी फ्ल्यूची लक्षणं दिसल्यास काय करायचं? ही बातमी वाचा!

सध्या राज्यभरात राज्यातील सुमारे 67 हजार 701 लोकांना घरीच विलग राहण्याचा (होम क्वॉरंटाइन) सल्ला दिला आहे. तर 5 हजार 59 जण विविध रुग्णालयात दाखल आहेत. ज्या शहरांत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत, त्या भागांत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona 350 new patients across the state