Coronavirus : कोरोनाचे प्रतिबंधात्मक उपाय

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 April 2020

कोरोनावर विजय मिळविण्यासाठी स्वच्छता आणि आरोग्य राखण्याच्या पद्धतींचे काटेकोर पालन करावे.ज्या भागामध्ये नागरिकांची जास्त घनता आहे तेथे विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तेथे स्वच्छतेबाबतच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी आवश्‍यक आहे. तसेच विविध उपयायोजनांव्दारे नागरिकांना आपल्या सवयी बदलणे गरजेचे आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सर्वांसाठी मास्क आवश्‍यक
तीन वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लहान मुलांसह सर्वांनीच पूर्णवेळ मास्क वापरणे गरजेचे आहे. सुती पुनर्वापराचा मास्क तयार करावा आणि वापरण्याविषयी माहिती घ्यावी.

हात वारंवार धुणे
हात धुण्यासाठी पायाने संचलित केलेली केंद्रे सार्वजनिक ठिकाणी स्थापन करावीत. प्रत्येकाने सॅनिटायझरने किमान २० ते ६० सेकंद हात धुणे गरजेचे आहे. 

स्वच्छतागृहाचा वापर
कुठल्याही व्यक्तीने उघड्यावर मलविसर्जन करू नये.प्रत्येकाने स्वच्छतागृहाचा वापर करावा. वापरानंतर स्वच्छतागृह स्वच्छ ठेवणे. स्वच्छतागृहात थुंकू नये आणि नाक, कान, डोळे आणि तोंडाला हात लावू नये. स्वच्छतागृहाच्या वापरानंतर हात स्वच्छ धुवावेत. 

जंतुनाशके 
दिवसातून तीन वेळा क्‍लोरिनमिश्रित जंतुनाशके वापरून फरशी पुसणे, रस्त्यांवर फवारणी करणे, भिंती स्वच्छ ठेवाव्यात. फिनाईल, क्‍लोरिन ब्लीच, लायसॉल वापरावे.

आरोग्य सेतू ॲप
आरोग्य सेतू ॲपव्दारे तुमच्या आजूबाजूला कोरोनाचे रुग्ण असल्यास तुम्हाला सावध करेल. तुम्हाला असलेल्या निदानाचे आणि तुम्हाला वैद्यकीय मदत मिळण्यास मदत होईल. या ॲपच्या माध्यमातून स्व तपासणी करू शकतो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona preventive solutions

Tags
टॉपिकस
Topic Tags: