दहावीचा भूगोलाचा पेपर अखेर रद्द; नववी, अकरावीचा निर्णय वाचा! 

टीम ई-सकाळ
Sunday, 12 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला आहे. 

पुणे Coronavirus  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला आहे. दहावीच्या निकालाबाबत पुढील कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळला दिले आहेत. तसेच, नववी व अकरावीच्या परीक्षाही घेण्यात येणार नाहीत. शाळा व महाविद्यालयातील अंतर्गत मूल्यमापनाद्वारे य्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, असा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा  गायकवाड यांनी रविवारी जाहीर केला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus maharashtra 10th geography paper cancelled minister varsha gaikwad