महाराष्ट्रावर कोरोनाची छाया गडद; 188 रुग्ण झाले बरे पण,

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

60 टक्के रुग्ण लक्षणांविना
कोरोनाच्या 218 नवीन रुग्णांपैकी 60 टक्के व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. प्रतिबंधित क्षेत्रांतील नागरिकांचा शोध घेताना हे रुग्ण सापडल्याची माहिती महापालिकेने दिली.

पुणे - राज्यातील १८८ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले असून त्याच वेळी  २१० नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या एक हजार ५७४ वर पोचली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात मरण पावलेल्यांमध्ये मुंबई येथील दहा तर, पुण्यातील एका रुग्णांचा समावेश आहे. आज मरण पावलेल्यांमध्ये ९ पुरूष आणि चार महिला आहेत, असे आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आले. आज झालेल्या १३ मृत्यूपैकी ६ जण हे ६० वर्षांवरील आहेत ५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० वर्षे या वयोगटातील आहेत तर दोघेजण ४० वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्युमुखी पडलेल्या ११ रुग्णांमध्ये (८५ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूची संख्या आता ११० झाली आहे. 

आजपर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या ३३०९३ नमुन्यांपैकी ३०४७७ जणांचे प्रयोगशाळा नमुने  निगेटिव्ह आले आहेत तर १५७४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १८८ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३८९२७ व्यक्ती घरगुती विलगीकरण असून ४७३८  जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. 

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण ४ हजार ३७४ सर्वेक्षण पथके  काम करत असून त्यांनी साडेसोळा लाखांहून अधिक लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

राज्यभर

  • लॉकडाउनचा भंग; ३४ हजार जणांवर एफआयआर
  • अकोल्यात चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
  • औरंगाबादेत डॉक्टरांच्या जागा कंत्राटी पद्धतीने भरणार
  • जळगावमधील सर्व बाजार समित्या बंद
  • कोल्हापूरमध्ये चौदाजणांचे अहवाल निगेटिव्ह
  • नगर बनले हॉटस्पॉट

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus maharashtra update 10th april 2020 marathi