राज्यात १५ नवीन करोना रुग्ण; पाहा कोठे किती रुग्ण?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

राज्यात कोरोनाचा विषाणूंचा संसर्ग झालेल्या आणखी15 रुग्णांची नोंद बुधवारी आरोग्य खात्यात झाली.  त्यामुळे राज्यातील बाधित रुग्णांची संख्या 123 झाली आहे.

पुणे : राज्यात कोरोनाचा विषाणूंचा संसर्ग झालेल्या आणखी १५ रुग्णांची नोंद बुधवारी आरोग्य खात्यात झाली.  त्यामुळे राज्यातील बाधित रुग्णांची संख्या 123 झाली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात आढललेल्या नवीन रुग्णांमध्ये मुंबई येथील सात रुग्ण असून, सांगली, इस्लामपूर येथील प्रत्येकी पाच, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई व पनवेलमधील प्रत्येकी एक रुग्ण आहे. या नवीन बाधित रुग्णांपैकी  सांगलीचे ५ रुग्ण हे  मंगळवारी बाधित आढळलेल्या ४ रुग्णाच्या संपर्कातील आहेत. नवी मुंबईतील ५७ वर्षीय पुरुष हा यापूर्वी करोना बाधित आढळलेल्या आणि मृत्यूमुखी पडलेल्या फिलीपाईन नागरिकाच्या संपर्कातील व्यक्ती आहे. कामोठे – पनवेल इथे आढळलेला ३८ वर्षांचा पुरुष हा त्रिनिदाद येथे गेला होता तर मुंबईतील अनुक्रमे २७ व ३९ वर्षाचे दोन पुरुष रुग्ण हे अमेरिका आणि संयुक्त अमिर अमिरात या देशांमध्ये प्रवास करुन आले आहेत. इतर ५ रुग्ण हे बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आहेत. कल्याण डोंबवली परिसरातील २६ वर्षाच्या तरुणाने तुर्कस्थानचा प्रवास केलेला आहे. 

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरनिहाय लागण झालेले रुग्ण
पिंपरी चिंचवड - १२    
पुणे मनपा - १८    
मुंबई – ४८ (३ मृत्यू)
सांगली - ९    
नवी मुंबई, कल्याण डोंबिवली - ६    
नागपूर, यवतमाळ - प्रत्येकी  ४    
अहमदनगर, ठाणे - प्रत्येकी ३    
सातारा, पनवेल – प्रत्येकी २    
उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार, पुणे ग्रामीण - प्रत्येकी १


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus maharashtra update 15 new patients information