जाणून घ्या, राज्यात कोठे किती कोरोना रुग्ण; मुख्यमंत्री म्हणतात, 'सरकार खंबीर' 

टीम ई-सकाळ
मंगळवार, 24 मार्च 2020

मुंबई पोलिसांनी काही लाख मास्क छापा टाकून पकडले आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदत करत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले पाहा.

मुंबई Coronavirus : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी राज्यातील जनतेनं सुरक्षित राहण्यासाठी घरातून बाहेर पडू नये, असं आवाहन केलं. तसचं राज्यावर हे गंभीर संकट ओढवलं असलं तरी सरकार खंबीर असल्याचं सांगत त्यांनी जनतेला दिलासा दिला आहे. आता केवळ गरज आहे ती, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनांचं पालन करण्याची.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबई पोलिसांनी काही लाख मास्क छापा टाकून पकडले आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदत करत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, 'जीवनावश्यक वस्तू आणि अन्न धान्याचा आपल्याकडे पुरेसा साठा आहे. मी आजच अन्न व नागरी पुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यानाही सुचना दिल्या आहेत. अजिबात काळजी करू नका. या अशा परिस्थितीत स्वयंसेवी संस्था, मंदिरे मदतीसाठी पुढे आले आहेत. लालबागच्या राजाने रक्तदान शिबिरे सुरु केले आहे. तर शिर्डी, सिद्धीविनायक यांनी देखील आपापल्या परीने मदतीची तयारी दाखविली आहे. मदत करणाऱ्या संस्थाना कुठेही अडचण येऊ नये, अशा सूचना मी दिल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी अडथळा येऊ नये, अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. हा महत्वाचा टप्पा आपण सर्वांच्या सहकार्याने पार पाडू या. संकट गंभीर आहे, पण सरकार खंबीर आहे.'

कोरोनाशी संबंधित अपडेट्स वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काय म्हणाले मुख्यमंत्री?

 • जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी अडचण येत असेल तर, १०० क्रमांकावर कॉल करा
 • जीवनावश्यक वस्तूंची, शेतमाल, अन्नधान्याची वाहतूक, आणि संबंधित कामगार ने आण करणारी वाहने अडवली
 • घरीच रहा आणि सुरक्षित राहा, टेहळणी करण्यासाठी बाहेर पडू नका
 • यंत्रणेवर ताण वाढेल, असं काही करू नका
 • जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरळीत सुरू 

कोरोनाशी संबंधित अपडेट्स वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यात कोठे किती रुग्ण?

 • पिंपरी चिंचवड – १२
 • पुणे – १८
 • मुंबई – ४१
 • नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली – ५
 • नागपूर - ४
 • यवतमाळ – ४
 • सांगली – ४
 • अहमदनगर - ३
 • ठाणे – ३
 • सातारा – २
 • पनवेल – १
 • उल्हासनगर – १
 • औरंगाबाद – १
 • रत्नागिरी – १
 • वसई विरार – १
 • पुणे ग्रामीण – १
 • एकूण -    १०७   
 • मृत्यू - ३

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus maharashtra update cm uddhav thackeray facebook