esakal | आपली दिनचर्या कशी असावी ते वाचा?
sakal

बोलून बातमी शोधा

Doctor

कोणत्याही रोगजंतूंशी लढा देण्याची क्षमता आपल्या शरीरात असते, त्यासाठी रक्तामध्ये पांढऱ्या पेशी असतात. त्या शरीरातील सैनिकाचे काम करतात. त्यांची ताकद वाढविण्यासाठी आहार आणि व्यायाम महत्त्वाचा असतो. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्याचे महत्त्व सर्वांना उमजले आहे. त्यादृष्टीने पावले टाकण्याची वेळ आता आली आहे.

आपली दिनचर्या कशी असावी ते वाचा?

sakal_logo
By
डॉ. शशांक शहा, बॅरियाट्रिक सर्जन

कोणत्याही रोगजंतूंशी लढा देण्याची क्षमता आपल्या शरीरात असते, त्यासाठी रक्तामध्ये पांढऱ्या पेशी असतात. त्या शरीरातील सैनिकाचे काम करतात. त्यांची ताकद वाढविण्यासाठी आहार आणि व्यायाम महत्त्वाचा असतो. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्याचे महत्त्व सर्वांना उमजले आहे. त्यादृष्टीने पावले टाकण्याची वेळ आता आली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

1) चांगली प्रतिकारशक्ती आवश्‍यक
कोरोना विषाणूंना प्रतिबंध करण्याच्या उपाययोजनांना मर्यादा असतात. यात आपली प्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्‍यक असते. शरीरात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही जीव-जंतूंशी लढा देणारी प्रतिकारशक्ती आपल्या शरीरात निर्माण होण्याची गरज असते. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो, त्यासाठी काळजी घेऊ शकतो. मधुमेहाच्या पूर्वावस्थेत आहेत, औषधे सुरू आहेत, वजन जास्त आहे, अशा सर्वांची प्रतिकारशक्ती कमी असू शकते. अशा लोकांनी प्रकर्षाने काळजी घ्यावी.

2) चौरस आहार असावा
न्याहरीपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत तुम्ही काय खाता हे फार महत्त्वाचे आहे. यासाठी चौरस आहाराला महत्त्व द्यावे. चौरस आहारात प्रथिनांचा समावेश असावा.न्याहरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, अंडी यांचा समावेश जरूर करावा. दुपारचं जेवण हलकं असावं. कमी उष्मांकाचं असावं. पण, त्यात पोषक अन्नघटक असणे आवश्‍यक आहे. त्यात पालेभाज्या, फळभाज्यांचा समावेश असावा.

3) ताजे अन्नपदार्थ खा
आहारात शक्‍यतो सर्व पदार्थ ताजे असावेत. ताजे पदार्थ आणि तेही गरम-गरम खावेत. गार अन्नपदार्थ किंवा फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न खाण्याचे टाळावे. बाहेरचे अन्नपदार्थ पूर्ण टाळावेत. बाहेरचे अन्नपदार्थ आपल्या डोळ्यांदेखत केलेले नसतात. तसेच, ते आपल्या घरी येईपर्यंत थंड झालेले असतात.

4) हे नक्की टाळा
तेल, फास्ट फूड, जंक फूड, साखर यांचा वापर सर्वांनीच टाळावा. सर्व प्रकारची थंड पेये घेऊ नयेत. फळांच्या रसाचाही यात समावेश आहे.

5) नियमित व्यायाम
कोरोनामुळे घरातून काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे, त्यामुळे ऑफिसमध्ये जाण्याच्या प्रवासाच्या वेळेत बचत होत आहे. त्याचा उपयोग आता व्यायामासाठी करावा. चौरस आहार आणि नियमित व्यायाम यातून प्रतिकारशक्ती वाढते. हे दोन्ही या विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी आवश्‍यक आहे. त्यामुळे घरी असल्याने हे दोन्ही करणे शक्‍य आहे. त्यातून प्रतिकारशक्ती वाढेल. घरातल्या घरातही व्यायाम करता येतो. श्‍वसनाचे उत्तम व्यायाम हे परिणामकारक ठरतात.

loading image